श्री शिवाजी विद्यालयात अंतरराष्ट्रीय योगदिन साजरा योगात १८५२ विद्यार्थ्यांचा सहभाग !
इंदापूर प्रतिनिधी: बावडा (ता. इंदापूर) येथे दि २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करण्यात आला श्री शिवाजी विद्यालय संस्थेच्या प्रांगणात योगासन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला पतंजली योग समिती इंदापुर व पशुवैद्यकीय विभागात कार्यरत आसणारे सहाय्यक डाँ संजय शिंदे यांनी शालेय मुला मुलींना आंतरराष्ट्रीय योगादिनाचे औचित्य साधून योगा व योगाचे महत्व या विषयावर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व अध्यापक बंधु-भगिनिंना उपयुक्त अशी माहिती दिली तसेच प्राणयम व योगासन प्रात्यक्षिके करुन दाखविली या योगा कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य श्री घोगरे डी आर , उपप्राचार्य श्री जगताप जी जे ,पर्यवेक्षक श्री हासे डी व्ही ,श्री बनकर पी टी, माजी हिंदी अध्यापक श्री सांगळे सर,व सर्व अध्यापक बंधु-भगिनिंनी सहभाग या योगासनात सहभाग घेतला शरीर मन आत्मा यांच्या निरोगी पणासाठी योगविद्या अत्यंत उपयुक्त आहे असे मत डाॕ संजय शिंदे यांनी व्यक्त केले यावेळी डॉ श्री संजय शिंदे यांचा विद्यालयाचे प्राचार्य श्री घोगरे सर यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने योगासने केली कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन श्री एस टी मुलाणी यांनी केले तर आभार उपप्राचार्य श्री जगताप जी जे यांनी केले . कार्यक्रम नियोजन सर्व अध्यापकांनी केले

