shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अलमिजान ने राखली यावर्षीही१००% निकालाची उज्वल परंपरा..!



श्रीरामपुर (शौकतभाई शेख) - 

येथील अलमिजान एजुकेशन ऍन्ड वेल्फेअर सोसायटी संचालित मखदुमियॉं कॉलेज ऑफ सायन्स चा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत यावर्षी देखील 100 टक्के रिजल्ट लागला असून  शाळेने यावर्षीही निकालाची आपली उज्जवल परंपरा राखली असून भविष्यात पुढे देखील विद्यार्थी घडविण्यात व शाळेची कारकिर्दीचा उल्लेख राज्य पातळीवर होईल असे प्रतिपादन अलमिजान एजुकेशन सोसायटीचे चेअरमन शेख मोहम्मद रफीक यांनी केले. 



या निकालानिमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, हे यश म्हणजे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ आणि शिक्षकांच्या कामांची पावती असल्याचेही ते म्हणाले. 
            
अलमिज़ान एज्युकेशनच्या नावाचा केवळ शहरातच नव्हेतर जिल्हा आणि राज्यभरात नावाजलेल्या संस्थेत नामोल्लेख केला जातो,

अलमिज़ान चे शिक्षक व विद्यार्थी विविध क्षेत्रात कामगिरी बजावून राज्यात अलमिज़ान चे नाव सातत्याने पुढे नेण्यात अग्रेसर असतात,अशा शब्दात हजरत मौलाना मखदुम हुसेन साहब उर्दू हायस्कूल व मखदुमियां कॉलेज ऑफ सायन्सच्या मुख्याध्यापिका सय्यद आरेफा असलम यांनी  गौरवोद्गार काढले,
यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे समता फाऊंडेशन चे अध्यक्ष शौकतभाई शेख, ऍड.मोहसिन शेख यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत,

यश संपादन करुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असुन शाळेच्या या कामगिरी बदल पालकवर्गातुन समाधान व्यक्त केला जात आहे.तसेच अनेकांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.सद्यस्थितीत" बालवाडी ते बारावी पर्यंत "अल्प जागेत उत्कृष्ट शिक्षण " देणार्‍या अल मिज़ान संस्थेचे नाव मोठ्या अभिमानाने झळकत आहे. 
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रिडा क्षेत्र असो व इत्यादी प्रत्येक क्षेत्रात अलमिजान चे नाव अग्रेसर आहे. उत्तीर्ण  झालेले  पाहिले  तीन विद्यार्थी खालील प्रमाणे १) सय्यद फैज़ान अ. करीम ७६.१७ टक्के, २) जहागीरदार उम्मेहानी असलम ७४,५०:टक्के, ३) मेमन सानिया कदीर  ७३,३३ टक्के. निकाल उत्कृष्ट लावण्यासाठी कॉलेज व हायस्कूलच्या प्राचार्य आरेफा सय्यद,आरिफ शेख,नसीमा सय्यद,रफीक शेख,आश्विनी यादव मॅडम,नदीम (शबाब ) शेख, फरहीन शेख, इब्राहिम बागबान,अरबाज पठाण, शाहनवाज गुलाम, तसेच अलमिजान शाळेचे मुख्याध्यापक इमदादुल्लाह शेख, उप मुख्याध्यापक इकबाल काकर व शाळेतील  शिक्षक फिरोज़ खान पठाण  आणि कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
close