shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वराज्य पोलीस मित्र संघटना अहमदनगर जिल्हा सरचिटणीसपदी समीरभाई शेख

अहमदनगर (प्रतिनिधी): -  समाजाची सेवा करण्याचे व्रत मनाशी बाळगून असलेल्या स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटना अंतर्गत असलेल्या पोलीस मित्र संघटनेच्या अहमदनगर जिल्हा सरचिटणीस पदी समीर शेख यांची पदोन्नती करण्यात आली आहे. 

संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे (देवा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटना चे कार्य संपुर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्य़ात व प्रत्येक तालुक्यात मजबूत संघटन आहेच त्यातही अहमदनगर जिल्ह्यात बऱ्यापैकी चांगले संघटन आहे आणि समीरभाई शेख यांचे कार्य तर खरंच कौतुकास्पद आहे ते म्हणजे असे की, संघटनेत त्यांचा प्रवास नेवासा तालुका उपाध्यक्ष म्हणून सुरू झाला आणि बघता बघता त्यांनी नेवासा तालुका नव्हे तर इतर तालुक्यांमध्येही चांगले संघटन निर्माण केले यामुळे त्यांचा कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख भरत नजन, महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष जावळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन दिघे (गुरु), यांनी घेतली व त्यांचे कार्य वरिष्ठांना सांगितली आणि समीरभाई शेख यांचे कार्य बघुन नेवासा तालुका उपाध्यक्ष पदावरुन अहमदनगर जिल्हा सरचिटणीसपदी त्यांची पदोन्नती  करण्यात आली.

त्यांच्या निवडीबद्दल सोनईचे संरपच धनंजय वाघ,आझाद सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नजीरभाई सय्यद,अँड जमीर शेख, उपसरपंच प्रसाद हरकळे, फिरोज पठाण, माजी संरपच दादासाहेब वैरागर, स्वाभिमानी संपादक  सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख, समता फाऊंडेशनचे ऍड.मोहसिन शेख, पोलीस मित्र संघटना अहमदनगर जिल्हाध्यक्ष सचिन चांदघोडे पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे तर सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.
close