shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भालेराव पब्लिक स्कुल मधून फिनिक्स सोनारकर प्रथम..!

अनेकांनी केले त्याचे अभिनंदन... 

चंद्रपूर ◼️ किरण घाटे-◼️

बल्हारपूर येथील भालेराव पब्लिक स्कुल मधून फिनिक्स नरेंद्र सोनारकर या विद्यार्थ्यांने मार्च महिन्यात पार  पडलेल्या १० वीच्या परीक्षेत ९३.८० टक्के गुण घेऊन शाळेतून पहिला येण्याचा मान पटकाविला आहे.पुरेसे शैक्षणिक संसाधन नसतांना बिकट आर्थिक स्थितीत त्याने संपादित केलेल्या यशा बद्दल त्याचे कौतुक होत आहे.

           


फिनिक्स हा पत्रकार नरेंद्र सोनारकर यांचा एकुलता एक चिरंजीव असून,त्याचा यशा बद्दल त्याची आई रुपाली सोनारकर,हर्षल नवघरे भालेराव पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापक सीमा भास्करवार ,सीमा पांडे ,हेमलता जयस्वाल यांनी विश्वास दर्शविला होता.त्यांच्या विश्वासावर खरे उतरल्याचा फिनिक्सला आनंद आहे.

         

त्याला आय.आय.टी. ला जायचे असून,त्याने आपल्या यशाचे श्रेय विषभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, वडील नरेंद्र सोनारकर,आई रुपाली सोनारकर ,शाळेतील सर्व शिक्षक मंडळी यांना दिले आहे.त्याच्या यशा बद्दल राज्याचे माजी वित्त, नियोजन,वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,पुरोगामी साहित्य संसदेच्या जिल्हा अध्यक्षा योगिता रायपुरे,डॉ.शीतल सोनारकर,पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ संघटक निलेश ठाकरे,आंबेडकरी आंदोलनाचे नेते पवन भगत,डॉ.भाष्कर सोनारकर आदींनी त्याचे अभिनंदन केले असून त्यास  उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा  दिल्या आहे.

close