shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्यावतीने डॉ.सलिम सिकंदर शेख यांचा सत्कार

श्रीरामपूर (शौकतभाई शेख): - पवित्र रमजान महिन्यात रोजा (उपवास) आणि जकात,फितरा, हलाल रोजी,हलाल आहार, परोपकार, आई-बाबांचा सांभाळ,या सह आरोग्य विषयक अशा अनेक बाबतीत अचुक मार्गदर्शन करुन सलग महिनाभर तीस लेख "दैनिक राष्ट्र सह्याद्री, "दैनिक मेहकर टाईम्स" दैनिक गुहागर टाईम,समता न्यूज पोर्टल, बिनधास न्यूज पोर्टल, दै.धुमाकूळ, ईत्यादी अनेक  दैनिकांमधे व न्युज पोर्टल आणि ब्लॉगमध्ये तथा अनेक सोशल मीडियावर वर्तमानपत्रातून "इस्लाम समजून घेताना" ही प्रबोधनात्मक लेखमालिकाद्वारे अचुक इस्लाम चे  मार्गदर्शन केल्याबद्दल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीने त्यांचा येथील संगमनेररोडवरील व्हीआय.पी.रेस्ट हाऊसवर सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सत्कार करताना ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्सारी समवेत समता फौंडेशनचे ऍड.मोहसिन शेख ,महाराष्ट् काकर समाज फौडेंशन चे संस्थापक अध्यक्ष व ऑल इंडिया मुस्लिम ओ. बी. सी. ऑर्गनायझेशन चे जिल्हा उपाध्यक्ष इकबाल काकर सर, सचिव जाकीर शहा,औरंगाबाद येथील प्रसिद्ध मिर्जा बुक पब्लिकेशन व मिर्जा बुक लायब्ररी चे प्रमुख व आॉल ईंडिया ओ. बी. सी  ऑर्गनायजेशन चे प्रमुख प्रवक्ता कारी अब्दूल कय्यूम नदवी साहब, अहमदनगर जिल्हाध्यक्ष हाजी फयाजभाई बागवान, समता फौंडेशनचे अध्यक्ष व दैनिक समतादूतचे संपादक शौकतभाई शेख, एम आय एम चे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष आदील मकदुमी सहाब या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. 

डॉ.सलिम शेख हे उत्कृष्टरित्या आपली वैद्यकिय  सेवा सांभाळून, नेहमी सर्व धर्म समभाव अबाधित राहावे तथा सामाजात नेहमी सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी नेहमी प्रयत्नशिल असतात, व सामाजिक कार्यात योगदानासाठी सतत तत्पर आणि अग्रेसर असतात, इस्लामबद्दल समाजात जे गैरसमज आहेत ते पवित्र कुराण व हादीस या पवित्र ग्रंथाच्या अभ्यासानुसार प्रबोधनात्मक लेख लिहून जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील असतात,तसेच मागे संपूर्ण करोनाच्या भयंकर महामारीत आपल्या लेख मालिकाच्या माध्यमातून दोन वर्षे सतत जनजागृती अभियानाद्वारे सामाजातील सामाजिक उणीवा दुर करण्याचा प्रयत्न करत रुढी-परंपरा आणि समज- गैरसमज याबाबत  सुयोग्य मार्गदर्शन करून मोठे सामाजिक कार्य केले आहे,त्यांच्या पवित्र रमजान महिना लेखमालेमुळे केवळ इस्लाम धर्मियच नसुन अनेक धर्मिय बंधू भगीनींना देखील इस्लाम आणि रमजान उपवासाचे महत्व समजून आले आहे,असे सखोल अभ्यासपूर्ण डॉ.सलिम यांचे समाजाभिमुख लेख असतात असेही उपस्थितीतांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी ऑर्गनायझेशनचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष हाजी फयाजभाई बागवान,सामाजिक कार्यकर्ते अहमदभाई जहागीरदार,ऑल ईंडिया ओ. बी. सी. आॉर्गनाईजेशनचे जालना हून आलेले गुफरान शब्बीर अन्सारी, एम.आय.एम.अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष  आदीलभाई मखदूमी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष मुस्ताकभाई तांबोळी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तौफिक शेख,ऑल इंडिया मुस्लिम ओ. बी. सी. जिल्हा सचिव इब्राहीम बागवान सर,खजिनदार आरिफ कुरैशी, सह खजिनदार राजु कुरैशी, सह सचिव नादीर खान, विविध सामाजिक संघटनेचे राहुरी राहाता,संगमनेर,कोपरगांव  व संपूर्ण जिल्हा भरातील पदाधिकारी व सदस्य  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close