शनिवारी इंदापूर येथे भव्य नोकरी महोत्सव.
नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर यांच्या वतीने आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर यांच्या वतीने मुकुंद शहा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी महोत्सव याचे आयोजन करण्यात आले असून या नोकरी महोत्सवाचा इंदापूर शहर व तालुक्यातील युवकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन भरत शहा यांनी केले आहे.
इंदापूर तालुका व शहरातील युवक-युवतींच्या उज्वल भविष्यासाठी १८ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पात्र विद्यार्थ्यांनी आपले सर्व कागदपत्रे घेऊन शहा संस्कृतिक भवन येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक गोकुळदासजी (भाई) शहा, नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ चे सचिव मुकुंद शहा, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स रिटेल, बँकिंग इन्शुरन्स, टेलिकॉम आयटी, टेलिकॉम फॅसिलिटी फार्मा मध्ये संधी उपलब्ध होणार आहे.यासाठी आठवी दहावी बारावी, बीए बीकॉम, बी एस सी, एम एस सी, आयटीआय डिप्लोमा या सर्वांसाठी सुवर्णसंधी आहे.स्थळ; शहा संस्कृतिक भवन एसटी स्टँड च्या पाठीमागे इंदापूर.
संपर्क क्रमांक.९९२१७७७८८९,९६६५१८६५४

