shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहार जनशक्ती पक्षाची श्रीरामपूर मध्ये रविवारी आढावा बैठक..!


श्रीरामपूर - दि. ८ जून 
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ति पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची रविवारी १२ जून रोजी सकाळी १० वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मतदारसंघाचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव खडके यांनी दिली आहे. 

         प्रहार जनशक्ति पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री मा.ना. श्री. बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली.. तसेच जिल्हाध्यक्ष मा. श्री अभिजीतदादा पोटे साहेब यांचे आदेशाने.. आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा राज्य शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे अध्यक्षतेखाली.. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रहारच्या सर्व पदाधिकाऱ्यांची रविवार दि.१२/०६/२०२२ रोजी शासकीय विश्राम गृह, संगमनेर रोड, श्रीरामपूर या ठिकाणी सकाळी ठीक १०.०० वाजता विवीध विषयावर आढावा बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती खडके यांनी दिली.    

       पुढे बोलताना खडके म्हणाले की, नामदार बच्चूभाऊ कडू यांचा आगामी अहमदनगर जिल्हा दौरा,   सर्व पदाधिकारी यांचा कामाचा आढावा,  संघटनेत कामकाज करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा विनिमय, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणूक, तसेच नवीन सदस्य नोंदणी व शाखा उघडणे आदी विषयांवर या बैठकीत प्रामुख्याने आढाव घेतला जाणार असून पक्षाची ध्येय धोरणे समजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा उद्देश या बैठकीतून साधला जाणार आहे, या बैठकीला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व तालुका पदाधिकारी, शहर अध्यक्ष, शाखा अधक्ष्यासह इतर सर्व पदाधिकारी हजर राहणार असल्याचे खडके यांनी सांगितले.
close