shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा मध्ये इयत्ता बारावीच्या निकालाची परंपरा कायम.

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा मध्ये इयत्ता बारावीच्या निकालाची परंपरा कायम.
 
कला, विज्ञान व एम .सी.व्ही. सी विभागात आठ मुली प्रथम तीन क्रमांकमध्ये मुलांपेक्षा मुली सरस.
इंदापूर प्रतिनिधी:श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथील इयत्ता बारावीच्या  परीक्षेचा निकाल दिनांक ८ जून रोजी झाला असून या विद्यालयांमध्ये मुलांपेक्षा मुलींनी अव्वल स्थान पटकावले. त्यामुळे या मुलींचे विशेष कौतुक होत असताना दिसत आहे.

श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा इयत्ता बारावी परीक्षा सन २०२१-२२  विज्ञान विभागाचा निकाल १००% लागला या विभागात एकूण २२२ विद्यार्थी बसले होते. यामध्ये प्रथम क्रमांक   अंकिता भगवान देवकर बाभूळगाव ९०.६७% ,द्वितीय क्रमांक  केतकी केतन पवार बावडा शेटे वस्ती८९.००% ,तृतीय क्रमांक  अनुष्का राजेंद्र  नायकुडे बावडा ८७.८३% यांनी पहिले तीन क्रमांक विज्ञान शाखेमध्ये मिळवले आहेत.
तसेच कला विभागाच्या निकाल ९६.३३% लागला असून या विभागात एकूण १०९ विद्यार्थी बसले होते त्यापैकी १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक रोहन दत्तात्रय पवार वडापुरी ७७.५०%, द्वितीय क्रमांक पूजा विजय शेंबडे पिठेवाडी ७६.५०%, तृतीय क्रमांक पोर्णिमा तानाजी लांडगे ७५.००% यांनी कला शाखेत प्रथम तीन क्रमांक मिळवले आहेत.
तर एम .सी.व्ही. सी विभाग यामध्ये ९७.३६% लागला असून एकूण विद्यार्थी ३८ बसले होते त्यापैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये प्रथम क्रमांक समृद्धी बाळकृष्‍ण मोहिते भगतवाडी७७.८३%, द्वितीय क्रमांक अंजली जालिंदर पवार गारअकोले७७.१७%, तृतीय क्रमांक गौरी अनिल बनकर झगडेवाडी ७५.५०% यांनी एम .सी.व्ही. सी विभागामध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तसेच संचालक उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव किरणसिंह पाटील, खजिनदार राजेंद्र सूर्यवंशी व इतर संचालक मंडळ व सर्व शिक्षण प्रेमी, प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
close