shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर बारावीचा ९९.४०% लागला निकाल

श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर बारावीचा  ९९.४०% लागला निकाल.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील वालचंद नगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर या विद्यालयाचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल लागला असून यामध्ये विज्ञान ,कला व  वाणिज्य विभागांमध्ये एकूण ९९.४०% इतका निकाल लागला आहे.
यामध्ये विज्ञान विभागात प्रथम क्रमांक साक्षी सुनील जगदाळे ७८.५०%, द्वितीयअक्षदा विश्वास पवार व अंजली अंकुश रणमोडे ७८.००%, तृतीय क्रमांक ओम विजयकुमार जगताप ७७.८३.

कला विभाग यामध्ये प्रथम सोनाली कमलाकर मोरे ८७.८३%, द्वितीय क्रमांक भाग्यश्री महादेव डोंगरे७१.८३%, तृतीय क्रमांक विजया काकासो नाईक नवरे व अंजली अधिकराव यमगर ७१.१७%.

वाणिज्य विभाग यामध्ये प्रथम क्रमांक अक्षय विजयकुमार रामउपाध्य८७.८३%, द्वितीय क्रमांक ओंकार संतोष काळकुटे८३.१७%, तृतीय क्रमांकसाक्षी नंदकुमार गांधी८२.८३%
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर.शाळा समिती अध्यक्ष  अमोल गेंगजे,प्राचार्य हनुमंत कुंभार,उपमुख्याध्यापक  बाळासाहेब पडारी,उपप्राचार्य  अरुण निकम शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
close