shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अशोक महाविद्यालयाचा बारावीचा ८८.४१ टक्के निकाल

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :- तालुक्यातील अशोकनगर येथील माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखालिल अशोक सहकारी साखर कारखाना संलग्न अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा तिन्ही शाखा मिळून ८८.४० टक्के इतका निकाल लागल्याची माहिती महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सुनिता गायकवाड यांनी दिली.

     यासंदर्भात माहिती देताना प्रा.गायकवाड यांनी सांगीतले की, अशोक महाविद्यालयाच्या बारावीच्या जाहिर झालेल्या निकालानुसार विज्ञान शाखेचा ९७.२७ टक्के, वाणिज्य शाखेचा ९१.४४ टक्के तर कला शाखेचा ७१.०८% याप्रमाणे निकाल लागला आहे. महाविद्यालयाने यावर्षीही विज्ञान व वाणिज्य शाखेच्या उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. कला शाखेत कु.मुंडलिक सुरेखा नारायण ८२.६७% (प्रथम), कु.पगारे प्रेरणा भाऊसाहेब ७३.६७% (व्दितीय) व कु.उंडे प्रीती ज्ञानेश्वर ६६% (तृतिय), वाणिज्य शाखेत कु.शेख सानिया निहाल ७८.७८% (प्रथम), कु.पिसाळ ऋतुजा पांडुरंग ७५.५०% (व्दितिय) व कु.माळी निशिगंधा बाळासाहेब ७०% (तृतिय) तर विज्ञान शाखेत कु.कसबे योगिता दीपक ७३.६७% (प्रथम), घावटे श्रेयस सुनिल ७२% (व्दितिय) व वेताळ शुभम नितीन ६९.५०% (तृतिय) याप्रमाणे यश संपादन केले.

     बारावीच्या सर्व गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचे अशोक कारखान्यांचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, अशोक ग्रा.शि.संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सचिव सोपान राऊत, सहसचिव भास्कर खंडागळे, कार्यकारी अधिकारी मंजुश्रीताई मुरकुटे, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सुनिताताई गायकवाड, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.सुयोग थोरात,परीक्षा विभागाचे प्रा.दिलिप खंडागळे ,कार्यालय अधिक्षक बाबासाहेब पटारे,अध्यापक वर्ग आदिंनी अभिनंदन केले आहे.
close