शिक्षक समितीच्यावतीने नुतन गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांचा स्वागतपर सत्कार संपन्न.
शिक्षकांची कामे प्राधान्याने करणार - अजिंक्य खरात.
शिक्षक समितीचे व तालुक्यातील सर्व शिक्षक सभासद शिक्षण विभागाचे सर्व उपक्रम पूर्ण करणार - ज्ञानदेव बागल.
इंदापूर प्रतिनिधी: दि ९ शिक्षक समिती इंदापूर शाखेच्या वतीने इंदापूर तालुका पंचायत समितीचे नुतन गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात साहेब यांचा पंचायत समिती कार्यालयात फेटा , पुष्पगुच्छ देवून शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
*यावेळी शिक्षक समितीचे पदाधिकारी , सदस्य यांचेशी गटशिक्षणाधिकारी खरात साहेब यांनी सविस्तर चर्चा केली.श्री खरात साहेब बोलताना म्हणाले शिक्षकांची विविध प्रकारची कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील.त्याचप्रमाणे गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.*
प्रसंगी शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल , शिक्षक सोसा. माजी चेअरमन वसंत फलफले , केंद्र प्रमुख संभाजी आजबे , उपाध्यक्ष नजीर शिकीलकर , कोषाध्यक्ष भारत ननवरे , सिद्धार्थ चव्हाण , सुनिल शिंदे , शहाजी पोफळे , सुनिल चव्हाण , अरूण मस्तूद , सतिश खटके , महादेव गव्हाणे , भरत गावडे , बापूराव जाधव , मनोहर जाधव , जुनी पेन्शन अध्यक्ष संतोष हेगडे उपस्थित होते.

