shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभागाचा दणका -अवैध रेतींची वाहने पकडली !

चंद्रपूर -◼️किरण घाटे -◼️

अवैध गौण खनिजांवर अंकुश तथा दंडात्मक कारवायां करण्यासाठी साठी चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभागाने कंबर कसली असून नुकतेच जुनोना आसेगांव या मार्गावर अवैध रेतींचे दोन ट्रक पकडले आहे.त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त असुन ही कारवाई चंद्रपूरच्या अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर व जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शनाखाली खनिज निरीक्षक बंडू वरखडे,दिलीप मोडके ,भौ.मा.प्र.स.अल्का खेडकर यांनी केली आहे.





चंद्रपूर जिल्ह्यात काही रेती घाटांचे लिलाव शासनाने वतीने झाले आहे तर काही रेती घाटांचे लिलाव होणे शिल्लक आहे.अश्यातच जुनोना -आसेगांव या मार्गावर अवैध रेतींचे वाहने सुरु असल्याची गुप्त माहिती चंद्रपूर खनिकर्म विभागाला मिळाली.त्यांनी या माहितीच्या आधारे अश्विनसिंग ठाकूर व कौस्तुभ सुधिर खांडरे यांचे अवैध रेतींची वाहने पकडली या वाहनांवर दंडात्मक कारवाई पोटी  प्रति तीन लाख नव हजार दोनशे प्रमाणे एकूण सहा लाख अठरा हजार चारशे रुपयें दंड ठोठावण्यात आला असल्याचे समजते .या कारवायां मुळे रेती तस्करांत एकच खळबळ उडाली आहे.जिल्हा खनिकर्म विभागाच्या विशेष पथकाने या आधी सुध्दा चंद्रपूर जिल्ह्यात  अवैध गौण खनिज प्रकरणात मो
ठ्या प्रमाणात कारवायां केल्या आहे .हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.

close