दंडात्मक कारवाईचे नोटीस देणे बंद करा -अन्यथा आंदोलन करु! आपचा मनपाला इशारा
चंद्रपूर -▪️किरण घाटे▪️
चंद्रपूर शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी मनपा कडून जनतेला नोटीसां बजावण्यात आलेल्या आहे. सदरहु नोटीसां मध्ये दहा दिवसात रेन वॉटर हार्वेस्टिंग न करणाऱ्या मालमत्ता धारकांवर २०,०००/-(वीस हजारांची) दंडात्मक कारवाई करण्याची सुचना देण्यात आलेली आहे. या बाबत कोणाचा विरोध नसून प्रशासनाद्वारे जनतेचे मत विचारात घेणे अत्यंत महत्वाचे होते.
परंतु असे न करता हुकुमशाही प्रमाणे दंडात्मक कारवाई करणे हे लोकशाहीची हत्या केल्या सारखे आहे.
चंद्रपूर महानगर 3 झोन मध्ये विभागलेला आहे, या झोन क्रमांक 3 मध्ये दलित वस्ती, कामगार वस्ती आहेत .ज्यात हातावर आणुन पानावर खाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, अशा वेळी जवळून 8 ते 10 हजार खर्च करणे परवडणारे नसल्याने तेथील जनतेची तक्रार आम आदमी पार्टी कडे येत आहे. आज शहराचे सचिव राजू भाऊ कुडे यांच्या नेतृत्वात मनपाला एका निवेदनातून विनंती करण्यात आली की 5000-/ (पाच हजार रुपये) अनुदान जे रेन वॉटर हार्वेस्टिंग नंतर देण्यात येणार आहे ते सुरुवातीलाच द्यावे नंतर जे हार्वेस्टिंग करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. कोरोना काळ असल्यामुळे मागील दोन वर्षापासून बहूतांशी कामधंदे , व्यवसाय बंद होते .घर चालविणे कठीण झाले होते .परिस्थिती अजूनही सुदृढ झाली नाही त्यातच हा रेन हार्वेस्टिंगची जबरदस्ती ,त्यामुळे मनपाने तात्काळ नोटीसां पाठवण्याचे काम बंद करावे अशी मागणी आप तर्फे करण्यात आली.
कोणत्याही गोर गरीब जनतेवर होणारी दंडात्मकाची कारवाई आम आदमी पार्टी कधीच खपवून घेणार नाही. येत्या तीन दिवसांत या नोटीसा देने बंद केले नाही तर गरीब जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनपाला आप कडून देण्यात आला आहे.
या वेळी आपचे शहर सचिव राजू कुडे, महिला शहर उपाध्यक्ष जास्मिन शेख, बाबूपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंडे, वैभव खंडाळे, महीला शहर उपाध्यक्ष रूपा कातकर, महीला शहर सचिव आरती आगलावे, महीला शहर संघटन मंत्री सुजाता बोदेले, जयदेव देवगडे, कालिदास ओरके, सुखदेव दारुंडे, अभिषेक टेंभूर्णे बाबाराव खडसे, आदीं उपस्थित होते.


