shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१५१) पर्यावरण जनजागरण आणि आरोग्य साक्षरता....., अखेरीस पेंद्या... पेंद्याच राहीला..!



      महाभारतातील वंचितांचे प्रतिनिधित्व करणारा पेंद्या आज देखील तसाच आहे.अर्थात हे सत्य कितीही वेदना देणारे असले तरी सामाजिक संतुलन, सामाजिक समरसता हे विषय पराकोटीच्या पोटतिडकीने जोपर्यंत समजून घेतले जात नाहीत तोपर्यंत पेंद्या पेंद्याच रहाणार आहे.

 पेंद्या हा विषय महाभारतात गो संवर्धन संदर्भात वापरलेला आहे. आज देखील 'गाई वाचवा गोशाळा वाढवा' गाईचे महत्व याबाबत मोठ्या प्रमाणात लोक जागृती करण्यात येत आहे. पण ही लोकजागृती करताना कोणत्याही प्रकारे गोशाळेत गोपालन करणारा जो गो सेवक आहे, गोपाळ आहे त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी, आर्थिक सुदृढतेसाठी कोणत्याही प्रकारे विचार केला जात नाही.

 वास्तविक पाहता भारतीय गोवंशाचे गोधन हा पर्यावरण रक्षणातील अत्यंत महत्वाचा मुलभूत घटक आहे. शासन पातळीवर, सामाजिक पातळीवर, धार्मिक  भागवत कीर्तन प्रवचने, शालेय अभ्यासक्रमात कोठेही कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचा मुलाधार असलेल्या भारतीय गोवंशाचा सर्वसमावेशक अभ्यास होत नाही.

 केवळ जीवदया म्हणून काही मंडळी गोपालन करतात त्यामुळे काही प्रमाणात गोवंश शिल्लक राहिलेला आहे. 
गोसंवर्धन करावयास कामगार मिळत नाहीत अशी सार्वत्रिक बोंब आहे. गोपालन व गोसंवर्धन हा विषय केवळ बुद्धिजीवी व जीवदया जोपासणाऱ्या व्यक्तींकडून आज मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे. वास्तविक पाहता गोसंवर्धनातील अडचणी ह्या गोपालक म्हणजे प्रत्यक्ष गाई सांभाळणारा जो कामगार आहे त्याच्याकडून समजून घेणे गरजेचे आहे. 
पण दुर्दैवाने तो अशिक्षित आहे कारण त्याला मिळणारे वेतन होय. अनेक गोशाळांमध्ये स्थानिक कामगार वर्ग दिसून येत नाही. परप्रांतीय कामगार मागवावे लागतात अशी महाराष्ट्रातील गो शाळांची अवस्था झालेली आहे. शासनाने कोट्यावधींचे अनुदान द्यावे यासाठी परिषदांचे आयोजन करण्यात येते. यातून हा प्रश्न सुटणार आहे का? गाईंना चरायला पुरेशी गुरचरणे शिल्लक नाहीत, मग नैसर्गिक गोपालन शक्य होणार आहे का? 
याचे विज्ञाननिष्ठ कारण असे आहे की विश्वामध्ये केवळ भारतीय गोवंश हा असा एक प्राणी आहे की ज्याला पाठीवर वशिंड आहे.  त्या वशींडात असलेल्या सूर्यनाडीमुळे गाईला औषधी महत्त्व प्राप्त झालेले आहे. गाय जेवढा चारा खाते त्यापेक्षा शतपटीने उपयुक्त असे शेण व गोमूत्र देते. ज्या शेणामध्ये कोट्यावधी जिवाणू नैसर्गिकरित्या तयार करण्याची क्षमता असते. खतांना उत्तम पर्याय म्हणून गाईचे शेण तर कीटकनाशक म्हणून गोमूत्र हे स्वस्त व उपयुक्त आहे याचा प्रचार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही. शेण आणि गोमूत्र जे उत्पन्नाचा फार मोठा स्त्रोत ठरू शकते ते मातीमोल भावाने खत म्हणून विकले जाते तर काही ठिकाणी पूर्णतः उकिरड्यावर फेकले जाते. 
गाईच्या शेण व गोमूत्र मुळे जमिनीचा कस फार मोठ्या प्रमाणावर वाढतो व खतामुळे नापीक झालेली शेती पुन्हा कमी खर्चात पिकास अनुकूल होते हे सत्य विश्वाने मान्य केलेले आहे. पण आपण त्याचा प्रचार व शेतीतला वापर मोठ्या प्रमाणात करत नाही व खतांसोबत  कीटकनाशकांवर मोठ्या प्रमाणात खर्च करून शेती व्यवसाय तोट्यात आणतो.  गोशाळेत काम करणाऱ्या मजुरांना देण्यासाठी आपल्याकडे पैसाच शिल्लक राहत नाही. परिणामी भूमीला सुजलाम् सुफलाम् बनविणारे गाईचे शेण व गोमूत्र यामध्ये काम करणारा कामगार हा वंचितांच्या अवस्थेत जगत आहे. महाभारतातल्या पेंद्याची अवस्था जी होती तीच अवस्था आज गोशाळेतल्या कामगारांची आहे.  तेव्हादेखील पेंद्याला कोणी समजून घेतले नाही व आज देखील कोणी समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. हे कृषी व्यवस्थेवर आधारित भारतीय अर्थव्यवस्थेचे फार मोठे अपयश आहे असे म्हणावे लागेल.  जोपर्यंत गोपालन क्षेत्रात काम करणाऱ्या गोपालांना  सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही तोपर्यंत गोशाला संवर्धन व गोरक्षण यांचे संतुलन होणार नाही. 
पेंद्या काल जसा होता तसाच उद्या रहाणार आहे.
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण जनजागरण व आरोग्यसाक्षरता अभियानांतर्गत प्रसारित.

ले. पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने
मो. ९८८१३७३५८५
close