shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पळसदेव शेलारपट्टा येथे मुलांचे जंगी स्वागत.

पळसदेव शेलारपट्टा येथे मुलांचे जंगी स्वागत.
 
      इंदापूर प्रतिनिधी: मागील दोन वर्ष कोरोनामुळे शाळा सुरु होणे बाबत पालक व विध्यार्थी यामध्ये संभ्रम होता .मात्र या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे शाळा वेळेत सुरु झाल्या त्यामुळे विध्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण होते . पळसदेव भागातील ज़िल्हा परिषद शाळा शेलारपट्टा येथे विध्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके, वह्या ,खाऊ वाटप करून मुलांचे स्वागत करण्यात आले . त्यामुळे झालेल्या स्वागतामुळे मुले आनंदून गेली . 
      मुलांचे दफतराचे ओझे कमी करण्याच्या हेतूने शासनाने चार विषयाचे एक पुस्तक तयार केले आहे . पहिलीसाठी दर तीन महिन्याला १ नवीन असे वर्षात ४ पुस्तके दिली जाणार तर २ री ते ४ थी पर्यंत वर्षाला ३ पुस्तके दिली जाणार आहेत अशी माहिती मुख्याध्यापक संतोष भोंग यांनी दिली . सर्व विषयाचे एकच पुस्तक या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे दफतराचे ओझे कमी झाले आहे . त्यामुळे शासनाच्या या उपक्रमाचे पालकांनी स्वागत केले . 
       या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ इंजे ,उपाध्यक्ष दशरथ भोई , अशोक शेलार , पवार चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रामदास पवार , सचिव पूजा पवार , चंद्रकांत  जावळे ,मुख्याध्यापक संतोष भोंग सह  विध्यार्थी व पालक उपस्तित होते . 

close