श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा
येथे शाळेचा पहिल्या दिवसा निमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत करून केले मोफत पाठ्यपुस्तक वाटप.
इंदापूर प्रतिनिधी:श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथे नवीन शैक्षणिक वर्ष सन.2022-23 शाळेचा पहिल्या दिवसा निमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न.
विद्यालयांमध्ये नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचा विद्यालयाचे प्राचार्य घोगरे डी आर सर व उपप्राचार्य जगताप सर पर्यवेक्षक बनकर सर पर्यवेक्षक हासे सर व सर्व अध्यापक अध्यापिका यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी प्राचार्य घोगरे डी आर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर ज्येष्ठ शिक्षक पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील ,सःस्थेचे जेष्ठ संचालक उदयसिंह पाटील,सचिव किरण पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शना खाली नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनचे, स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुलाणी एस टी सर यांनी केले.

