shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अभियंत्यांचे प्रश्न लवकरात लवकर बैठक घेऊन सकारात्मकरीत्या मार्गी लावू-ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्तजी तनपुरे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 गुरूवार दिनांक १६ जून २०२२

अभियंत्यांचे प्रश्न लवकरात लवकर बैठक घेऊन सकारात्मकरीत्या मार्गी लावू-ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्तजी तनपुरे..!!

राहुरी : अभियंत्यांचे प्रश्न लवकरात लवकर बैठक घेऊन सकारात्मकरीत्या मार्गी लावू असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्तजी तनपुरे यांनी सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनच्या चतुर्थ कार्यकारिणी दोन दिवसीय बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी केले. 
 सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनच्या चतुर्थ कार्यकारणी बैठकीचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तसेच अभियंत्यांच्या सद्य परिस्थितीतील अडचणींवर प्रकाश झोतही टाकला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले तसेच अमोल अभंग हेही उपस्थित होते.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष अभि. केदार रेळेकर, सचिव अभि. संजय ठाकूर, उपाध्यक्ष अभि. संतोष खूमकर, संघटक अभि. अरुण गीते, महाराष्ट्रातून आलेले सर्व सहसचिव तसेच सर्व कार्यकारी अभियंते व नगर जिल्ह्यातील सर्व अभियंते उपस्थित होते.
      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता नगरचे सहसचिव अभि. धीरजकुमार गायकवाड यांनी केले. महाराष्ट्रातील 12000 अभियंत्यांच्या प्रतिनिधित्व करत असलेल्या एसईए संघटनेची वाटचाल, त्यांना येणार्‍या विविध अडचणी व येणाऱ्या काळात होऊ घातलेलं खाजगीकरण यासारख्या विविध प्रश्नांवर संघटनेचे सचिव अभि. संजय ठाकूर यांनी विस्तृत भाष्य केले. क्षितिज घुले यांनी आपल्या भाषणात पंचायत समितीच्या दैनंदिन कामकाजात महावितरणचे मिळणारे सहकार्य व अभियंत्यांना येणाऱ्या अडचणी याविषयी नमूद केले.

        याप्रसंगी महावितरणचे कृषी धोरण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवून कृषीपंपाच्या वसूलीत भरीव योगदान देणारे सहाय्यक अभियंता राजेंद्र धाडगे यांचा ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी काळोखे यांनी केले तर आभार अभिजीत रासकर यांनी केले.


Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close