शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्यसाधत पळसदेव ग्रामपंचायत सभागृहाचे श्री शाहू-फुले-आंबेडकर होळकर सभाग्रह नामकरण.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील पळसदेव ग्रामपंचायत या ग्रामपंचायत कार्यालय मधील भव्य सभागृहाचे नामकरण शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत पळसदेव चे सरपंच सौ इंद्रायणी सुजित मोरे व उपसरपंच सौ सोनाली मेघराज पाटील- कुचेकर यांच्या हस्ते पार पडले.
यापूर्वी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले .
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस शिवस्वराज्य दिन" म्हणून पळसदेव ग्रामपंचायत ता.इंदापूर मध्ये साजरा करण्यात आला आहे.

