shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रहार च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०७ जून २०२२

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रहार च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा..!! 

राहुरी फॅक्टरी : राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करणेत आला. 
     ६ जून १६७४ शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे काय तर शेकडो वर्ष गुलामगिरीत खिचपत पडलेल्या आपल्या रयतेला स्वराज्य नावाच्या पहिल्या स्वातंत्र्याचा दिलेला ठाम विश्वास म्हणजे शिवराज्याभिषेक. आपला एक रक्षणकर्ता राजा आहे, आपलं एक तख्त आहे याची रयतेला चिरंजीव हमी देणारा क्षण म्हणजे राज्याभिषेक. जगाच्या इतिहासातील एकमेव अशा सगळ्यात मोठ्या, अजरामर, भरभरून आनंद देणाऱ्या सोहळ्याच्या रयतेला राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करून सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

      प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, प्रहार चे राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष एकनाथ वाणी, देवळाली उपाध्यक्ष ओंकार मुसमाडे, शाखाध्यक्ष अमोल आंबिलवादे, सल्लागार प्रभाकर कांबळे, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे आदी उपस्थित होते.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close