राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. ६-६
द रॉयल प्रेझेंट दिवा क्वीन इंडिया या मॉडेलिंग शो चे पुढच्या महिन्यामध्ये पुणे मध्ये आयोजन करण्यात आले आहे असे रॉयल ग्रुप चे डायरेक्टर नितीन झगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. किड्स इंडिया आणि मिस्टर इंडिया असे सर्वच या शो मध्ये असेल.
मिस्टर.मिस.मिसेस.किड्स असे या शो चे स्वरुप आहे. पुणे मध्ये प्रथमच रॉयल ग्रुप चा इंडिया चा मॉडेलिंग शो च्या भव्य दिव्य शो ची जय्यत तयारी सुरु झाली आहे. रॉयल ग्रुप सर्व मॉडेल्स ला फिल्म क्षेत्रांत सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रॉयल ग्रुप ची असल्याचे सपोर्टिंग पार्टनर नमिता ताई पाटील यांनी सांगितले.
या शो मध्ये महाराष्ट्रातील 21 आदर्श महिलांना स्री कर्तुत्व आदिशक्ती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.या शो साठी सर्व क्षेत्रांतील दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहे.या मॉडेलिंग शो मध्ये 3 वर्ष ते 55 वर्ष वयोगटातील सर्वाना सहभागी होता येणार आहे.या शो साठी सर्व युवक आणि युवतींना आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त स्पर्धकांनी या शो मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रॉयल ग्रुप च्या श्रद्धा दराडे यांनी आवाहन केले आहे. ज्यांना या शो मध्ये सहभागी व्हायचे आहे आणि पुरस्कारासाठी नामांकन करायचे आहे त्यांनी 9766873917 आणि 9370931509 या नंबरवर संपर्क साधावा .या शो साठी प्रोडक्शन हेड आकाश रणदिवे,समाजसेविका जसवीन कौर छाबडा मैडम, दर्शना पाटील ,जागृती पाटील, अर्चना परदेशी, आरती बारसे, विद्या बडगुजर, ब्रँड अम्बेसिडर रेणुका ठाणगे ,कोमल नांदे,अब्रार शेख,निशा शिंदे ,सुरेखा भोसले , स्नेहल सरगर, एस.डी.आर फाऊंडेशन अध्यक्षा सीमा इंग्रोळे ,ज्योतिबा ऊबाळे, सीमा रजपूत , सरोज गजभिये ,कविता कुलकर्णी यांचे सहकार्य लाभत आहे.

