औरंगाबाद :- जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,वैजापूर यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कला,साहित्य, विज्ञान,कृषी,आरोग्य,सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील राज्यभरातल्या 51 व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
त्यातीलच एक पुरस्कारार्थी सतिष उखर्डे हे जालना जिल्ह्यातील टेंभूर्णी गावचे भूमिपुत्र असून ते आपल्या सामाजिक कार्यातून,व्याख्यान- प्रबोधनाच्या माध्यमातून चांगले विचार या तळागाळातील समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत.या अगोदर ही त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले असून त्यांना आमच्या *जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने यावर्षीचा (सन-2022) चा राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार" जाहीर झाला आहे...असे आयोजन कमिटीचे अध्यक्ष सूर्यकांत मोटे पाटील यांनी सूचित केले..

