shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने भव्य दिव्य गुरुकुलचे आयोजन..

श्रीरामपूर । प्रतिनिधी :-
सद्गुरु नारायणगिरिजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने व स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने भव्य दिव्य गुरुकुल आयोजित करण्यात आलेले आहे.


या गुरुकुलात विद्यार्थांना, टाळ, पखवाज, तबला,गायन,हरिपाठ,प्रवचन,किर्तन,श्रीमद्भगवद्गीता,योगासने,संस्कार, नवनाथांचा महीमा,रामायण कथा, श्रीमद् भागवत कथा अशा अनेक विषयांचे ज्ञान दिले जाणार आहे.कारण आपण बघत आहोत या जगामध्ये संस्कार हे कमी होत चाललेले आहे.कारण संस्कार हे संगतीवर अवलंबून असतात. जशी संगत असते तसे संस्कार आपल्याला त्यांच्यावर झालेले दिसतात.चांगले संस्कार हे आपल्याला संत संगतीतच मिळतात कारण संत काय करतात तर 
 अहिता पासूनी काढीती l
 हित देऊनी वाढविती ll

ते आपल्याला अहिताच्या मार्गापासून काढतात आणि चांगल्या मार्गाला लावण्याचे काम करतात.कारण आपण बघू शकतो जुन्या काळात सुद्धा सद्गुरूंच्या सानिध्यात विद्या प्राप्त करण्यासाठी जात असत.आपण श्रीकृष्ण.प्रभू रामचंद्र यांच उदाहरण घेऊ शकतो.
 गुरू ग्रह गये पढन रघु राई l
अल्प काल विद्या सब पाई ll 

जे या जगाचे मालक आहे ते सुद्धा सद्गुरूंच्या सानिध्यात विद्या ग्रहण करण्यासाठी जातात कारण चांगले संस्कार.चांगले विचार.चांगले मार्गदर्शन हे  संतांच्या सानिध्यातच प्राप्त होतात.त्यामुळे अडबंगनाथांच्या पवित्र तपो भुमिमध्ये ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांच्या अश्रूंनी तयार झालेली शिळा आहे.आणि त्याच शिळेवर अडबंगनाथांनी बारा वर्षे तपश्चर्या केलेली आहे.अशा पवित्र पावन भूमिमध्ये विद्यार्थींना ज्ञानार्जन होणार आहे.
 
  गुरू कुल वैशिष्ट्य:-
गुरुकुलात मोबाईल वापरता येणार नाही.
तरी या  गुरुकुलात सर्व विद्यार्थी यांनी  सदर ज्ञानार्जनाचा लाभ घ्यावा. 
          त्वरित अडभंगनाथ संस्थानशी संपर्क साधून आपली नावनोंदणी करावी.कारण प्रवेश मर्यादित आहे. 
 या ठिकाणी दररोज अन्नदान ही चालू आहे.
 येथे एक शित दिधल्या अन्न l
 कोटी कुळाचे होय उद्धरण ll
             या संतांच्या वचना प्रमाणे या पवित्र अडभंगनाथांच्या भूमीमध्ये अन्नदानाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज अन्नदान चालू आहे ज्या भाविक भक्तांना या सुवर्णसंधीचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी अडभंगनाथ संस्थानशी संपर्क साधावा ही नम्र विनंती.

🚩 ठिकाण. श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामाठाण (भामानगर) ता.श्रीरामपूर.जि.अहमदनगर.
     अन्नदानासाठी फोन पे गुगल पे नंबर.
    9921773005

संस्थान संपर्क नंबर
ज्ञानेश्वर महाराज काकडे.
7588605305.
 लखनगिरी महाराज
 7020902470.
close