shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन" साजरा.

वडापुरी ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन"  साजरा.

 
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.
राज्यात सोमवार दि. ६ जून रोजी "शिवस्वराज्य दिन" साजरा करण्यात येणार होता. त्या अनुषंगाने या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन आयोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे वडापुरी ग्रामपंचायत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्यात  आला आहे. 
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश चंदनशिवे, तंटामुक्ती अध्यक्ष
शिवाजी तरंगे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी फुगे, महेश देवकर, संजय ठोंबरे, नारायण पवार,  भारत चंदनशिवे, बापूराव पासगे, सचिन पासगे, निखिल चंदनशिवे, किशोर रेडेकर, सुरेश पवार इत्यादी उपस्थित होते.
close