shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे पांडुरंग (तात्या)हरिभाऊ शिंदे यांच्या ५५ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर .

इंदापूर येथे पांडुरंग (तात्या)हरिभाऊ शिंदे यांच्या ५५ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर .

आज सायंकाळी विविध पारितोषिकाचे वितरण व गरीब गरजू १०० महिलांना मोफत साड्या वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील इंदापूर नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेता नगर परिषद इंदापूर व इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल प्रमुख पांडुरंग हरिभाऊ शिंदे यांच्या ५५ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त व नरेंद्र मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज दिनांक १० जून रोजी सकाळी भव्य रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. या शिबिराच्या रक्तदानाची सुरुवात पांडुरंग शिंदे यांनी स्वतःपासून केली.
सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे असे पांडुरंग शिंदे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा ,मोफत बॉडी चेकअप ,भव्य डान्स स्पर्धा तसेच भव्य रक्तदान शिबिर आणि सामाजिक जीवनामध्ये ज्यांनी समाजासाठी योगदान दिले व सदर स्पर्धेतील पारितोषक पटवले चार क्रमांक मिळवलेले आहे अशांना बक्षीस व ट्रॉफी   पारितोषिकांनी सन्मानित करण्याचा कार्यक्रम आज दिनांक १० जून रोजी सायंकाळी होणार असून यावेळी गरीब व गरजू महिलांना १०० साड्यांचे मोफत वाटपही श्री संत सावता माळी मंगल कार्यालय इंदापूर येथे होणार असल्याचे पांडुरंग तात्या हरिभाऊ शिंदे मित्रपरिवार यांच्या वतीने  सांगितले.
close