shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरणार यांवर कारवाई करावी - महेमूदभाई सय्यद..!

शिर्डी । प्रतिनिधी : 
प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महेमूद सय्यद व समस्त मुस्लिम बांधवांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दातरे साहेब यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की आपला भारत देश हा विविध जाती धर्मांनी सजलेला आहे.

            
विविधतेत एकता अशी आपल्या देशाची संपूर्ण जगात ओळख आहे विविध जाती धर्माचे लोक आपल्या देशात कित्येक वर्षापासून गुण्यागोविंदाने राहतात परंतु मागील काही वर्षापासून मुस्लिम समाजाला टारगेट करून समाजाची बदनामी करण्यासाठी भडकाऊ भाष असाच प्रकार मागील आठ दिवसांपूर्वी घडला.भाषण देण्याची चढाओढ काही लोकांत लागली आहे असाच प्रकार मागील आठ दिवसांपूर्वी घडला मुस्लिम समाजाचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल पदाधिकारी नुपुर शर्मा व नवीन जिंदल यांनी त्यांच्यावर अपशब्द वापरले त्यांचा परिणाम समाजातील स्वास्थ व जातीय सलोखा बिघडण्यास कारणीभूत ठरत आहे.


           
तरी दोन्ही व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सर्व मुस्लिम समाज शिर्डी चे वतीने मौलाना अनवर व मौलाना मन्सूर व समस्त मुस्लिम समाज हाजी शमसुद्दीनभाई, महेमूदभाई सय्यद, अशरफभाई सय्यद, जावेदभाई शाह, मुक्तारभाई सय्यद, गुलामरसूलभाई शेख ,दादाभाई ईनामदार ,अनीस पठान, अबुलाला पठान,अखलाक खान,हसन सय्यद, जवेद शेख, समीर शेख, अल्लुभाई, शोयल सय्यद, साजिदभाई शेख ,अयूब भाई शाह ,बरकत सय्यद,हैदर सय्यद,अर्शद शाह ,मुज्जुभाई मौ.असगरली, सलीमभाई शेख,रोशन पठान ,नदीम भाई शेख, मतीन सय्यद,जावेद इनामदार, व शुक्रवारी सर्व मुस्लिम समाज शिर्डी पुलिस स्टेसनला एकत्र येऊन निवेदन देण्यात आले.
close