शेवगाव । प्रतिनिधी :-
आज वंचित बहूजन आघाडी तर्फे वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मा.शेवगांव येथील तहसीलदार वाघ व शेवगांव पोलीस निरीक्षक मा पुजारी यांना प्रेषित मोहम्मद (स.अ.स.) यांच्या बाबत अतिशय अभद्र व बेताल वक्तव्य करुन देशा मध्ये जातीय तेढ निर्माण करणारे भाजपाच्या महीला प्रवक्त्या नुपुर शर्मा व नविन जिंदल यांच्यावर यु.ऐ.पी.ए. अतंर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे लेखी निवेदन देण्यात आले,
या प्रसंगी वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, लक्ष्मण मोरे, युवा कार्यकर्ते सईद शेख, इरफान पठाण,आलिम बरकत टी. अब्बू जहागीरदार बाळासाहेब भोसले,रियाजभाई शेख, मुन्ना सैय्यद,अझहर इस्माईल शेख,शैबाज काजी, अक्षय शिंदे,,राजूभाऊ नाईक, विशाल ईंगळे, शेख सलीम जिलानी,शेख शफिकभाई, अज्जू भाई कुरैशी, शेख जब्बार भाई, अस्लम पठाण, शेख इस्माईल भाई,व ईतर सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यावेळी शेख प्यारेलालभाई म्हणाले की,आज आपल्या देशाची बिकट परिस्थिती आहे देशाचा विकास न करता देश भकास झाला आहे, भाजपाचा खरा चेहरा जनते समोर आलेला आहे, देशातील मुख्य प्रश्न सोडून भाजपामधील मनूवादी पिळावळ देशात अशांतता निर्माण करतात व फक्त हिंदू मुस्लिम करतात, बेताल वक्तव्य करुन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचेच उद्योग हे मनूवादी करतात सर्व जगामध्ये आपल्या देशाची अब्रू घालवणाऱ्या नुपुर शर्मा व नविन जिंदल यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करुन यू ए पी ए अतंर्गत तुरुंगात टाकले पाहीजे.
यामुळे असे धार्मिक तेढ निर्माण करणारे व धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करण्याची हिमंत कोणी करणार नाही असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

