शिवसैनिकांनी मानले शिवसेना नेतृत्वाचे आभार..!
अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी गेल्या वर्षभरापासून शिवसेना नेतृत्वाकडे स्थानिक व्यक्तींना विश्वस्त पदाची संधी देणेबाबत वारंवार पाठपुरावा केला होता, त्यास यश मिळाले असून नुकतेच साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेत शिवसेनेचे दोन स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देऊन श्री. सचिन कोते आणि डॉ. जालिंदर भोर यांची निवड झाल्याने शिवसैनिकांनी पेढे वाटून आनंदोस्तव साजरा केल्याची माहिती ग्रामीण भागातील सर्व शिवसैनिकांच्या वतीने शिवसेनेचे युवा नेते मुकुंद सिनगर यांनी दिली असून शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा. ना. उद्धव साहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे आभार व्यक्त केले.
नुकतीच अकोले येथे तालुक्यातील अंबड गावचे भूमिपुत्र, शिवसेनेचे आरोग्यदूत आदरणीय डॉ. जालिंदर बी. भोर यांची श्री साईबाबा संस्थान'च्या "विश्वस्त" पदी सार्थ निवड झाल्याबद्दल सन्मानित करत शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर लवकरच शिर्डीचे भूमिपुत्र श्री. सचिन कोते यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असून यापुढे त्यांच्याकडून साईभक्तांचे प्रलंबित प्रश्न सुटले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. सदर निवडीमुळे शिवसेना पक्ष वाढीसाठी बळ मिळणार असून सामान्य शिवसैनिकांना आधार मिळाला असल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी वसंतदादा मल्टीस्टेट संस्थेचे चेअरमन तथा शिवसेनेचे युवा नेते मा. मुकुंद जी सिनगर समवेत सर्व श्री. शाम दादा वाळुंज, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मा. जयवंत अण्णा पवार, शिवसेनेचे जेष्ठ नेते मा. अशोक मामा थोरे, मा.श्री. गणेश जी धुमाळ, श्री. सुनिल जी गिते, श्री. अतुल जी लोहाटे, श्री. मिलिंद जी नाईकवाडी, श्री.संतोष जी भोर, श्री. रविंद्र जी सोनवणे, श्री. गंगाधर जी सांगळे, अंबड गावचे मा. सरपंच डॉ. रविंद्र जी गोर्डे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.

