shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड कंपनी च्या वतिने वृक्षारोपण- रमेश यादव साहेब


लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा येथील डोंगर परिसरातील महादेव मंदिर वनविभाग परिसरात आज आंबा,चिकू, वड, पिंपळ, करंज अशा जंगली तसेच फळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड लोणी काळभोर कंपनी च्या वतीने १०१ वृक्ष ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांस देण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले. 

        मनुष्य स्वतःच्या हव्यासापायी आणि स्वार्थाकरता वृक्षांची वारेमाप कत्तल करीत सुटला आहे. पर्यावरणाशी त्याने चालवलेला हा खेळ उद्या त्याच्याच अंगाशी येणार आहे. झाडे नष्ट झाल्यामुळे ग्लोबल वाॅर्मिंग च्या समस्येने विक्राळ रूप धारण केले आहे . वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन न केल्यास सगळीकडे हाहाकार उडेल व मनुष्यासोबतच पृथ्वीवरील सगळया जीवजंतुंचे अस्तित्वच धोक्यात येईल . 

          हे होऊ द्यायचे नसेल तर जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत, व ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अशा सामाजिक संस्थांना सर्वांनी साथ देऊन हरित भारत बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत ग्रीन फाऊंडेशन चे कार्य खुप कौतुकास्पद आहे आमच्या कंपनी कडून शक्य होईल तशी मदत ग्रीन फाऊंडेशन यांस करू असे प्रतिपादन ( डी.वाय जनरल मॅनेजर- पाईप लाईन स्टेशन) श्री .रमेश बी यादव साहेब यांनी केले. या वेळी हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड चे विकी पिसे साहेब, ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप ,ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, ग्रीन फाउंडेशन पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राकेशभाऊ नखाते ,निलेश काळभोर, जीवन जाधव,हेंमत भांड,सनी गिरी, उपस्थित होते.
close