चंद्रपूर ▪️ किरण घाटे ▪️
चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी विभागात रेती तस्करांनी अक्षरशा दिवसाढवळ्या रेती नेण्याचा सपाटा लावला असून या कडे स्थानिक महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.वैनगंगा नदी घाटावरून रेती तस्कर रेती नेत असुन सदरहू नदीचे वैभव ओबळं धोबळं होत आहे तदवतचं ब्रम्हपुरीच्या उत्तरेला आभळी , चिकल ढोबळा , पिंपळगांव रेती घाट आहे.
या ही रेती घाटावरून दिवस रात्र मोठ्या प्रमाणात रेती चोरी जात आहे. अनेकांनी चढ्या भावाने पावसाळ्यात रेती विक्री करण्यासाठी रेतीचा अवैध साठा जमा करुन ठेवला असल्याचे कळते.परंतु या कडे वरिष्ठ अधिका-यांसह कर्मचा-यांचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. दिवस रात्र रेतीची चोरी करणाऱ्या अश्या रेती तस्करांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज गुरुवार दि.१६जूनला शिवसेना महिला आघाडी चंद्रपूर च्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे कडे एका लेखी निवेदनातून शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकार यांनी केली आहे.
निवेदन सादर करतांना निलीमाताई शेरे , वर्षा काळभूत , कुसुम उदार , शोभा कुठे, संगिता देवतळे , नलू मलोडे आदीं महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या .

