चंद्रपूर ◼️ किरण घाटे◼️
अन्न पुरवठा विभागाची रेशनकार्ड आँनलाईन करण्यासाठी अस्तित्वात असलेली AEPDSही ही साईड अनेक दिवसांपासून सुरळीत सुरू नसल्याने सर्व सामान्य नागरिकांना आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्यात दिसून येत आहे .
अशीच परिस्थिती महाराष्ट्रात सुध्दा असल्याचे बोलल्या जात आहे.सुरळीत सुरु नसल़ेल्या या आँनलाईन पध्दतीमुळे नागरिकांचे रेशनकार्ड संदर्भात असलेली सर्व कामे ठप्प पडल्याने कार्ड धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.रेशन कार्ड आँनलाईन करणे, नाव कमी करणे, नांव दर्ज करणे ,नविन आरसी देणे अश्या विविध प्रकारची कामे वेळेवर करण्यास अडचण निर्माण होवू लागली आहे त्या मुळे सर्व सामान्य जनता स्थानिक अधिकारी व कर्मचारी बांधवांवर आपला रोष व्यक्त करीत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. आँनलाईनच्या बाबतीत हा तांत्रिक बिघाड वरिष्ठ स्तरावरुन जरी असला तरी त्यात जलदगतीने सुधारणा करावी व सर्व सामान्य जनतेला दिलासा द्यावा अश्या आशयाची मागणी चंद्रपूरातील यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संस्थेच्या वतीने आज गुरुवार दि.१६जूनला राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ यांना चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचे मार्फत करण्यात आली.
या वेळी यंग चांदा ब्रिगेड आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे,विनोद अनंतवार, मून्ना जोगी , सिध्दार्थ मेश्राम,महेश चहारे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. याच निवेदनाच्या प्रती चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, प्रधान सचिव मुंबई, विभागीय आयुक्त नागपूर यांना पाठविण्यात आल्या असल्याचे जितेश कुळमेथे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना आज सांगितले.

