shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न ..


१०१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रतिनिधी : सूर्यकांत होनप

करमाळा : २ /  महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त सुतार तालीम, करमाळा येथे रक्तदान शिबिराचे उदघाटन आज दि . १ जुन रोजी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी युवा नेते शंभूराजे जगताप यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. 
 संजयमामा शिंदे गटाचे पश्चिम भागाचे नेते तानाजीबापू झोळ, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सचिन साखरे, देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड, बोरगावचे माजी सरपंच विनय ननवरे,  विजय लावंड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराची उत्साहात सुरुवात झाली.

 यावेळी डॉ. श्रीराम परदेशी आणि डॉ. बिपिन परदेशी यांनी रक्तदानाविषयी जागृती पर मार्गदर्शन केले. प्रथम पाच रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समितीचे विशाल राठोड यांनी केले. अमोल परदेशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण (सर) परदेशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश परदेशी,चरणसिंग परदेशी, नितीन परदेशी, अभिषेक परदेशी, डॉ. कमलेश परदेशी यांनी परिश्रम घेतले .

   यावेळी विजयसिंह परदेशी, आर. आय. परदेशी,बुधभूषण फाउंडेशनचे व्हा .चेअरमन दुर्गेश राठोड, अंकुश धनवे, अजितसिंग परदेशी, हनुमानसिंह राजपूत, मंगलसिंग राजपूत, जितेश कटारिया,अरुण टांगडे, संग्रामसिंह देशमुख, संजय चौधरी आदींसह  बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
close