प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २/ करमाळा तालुक्यात अवकाळी व मोसमी पावसाच्या वादळी वाऱ्यासह गारा पडून घरांचे व फळ बागांचे नुकसान झाले आहेत. त्यांचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सीना कोळगाव धरणग्रस्त अध्यक्ष सतीश नीळ यांनी लेखी अर्जाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.
करमाळा तालुक्यातील निमगाव (ह) येथील व तालुक्यांत काल झालेल्या अवकाळी व मोसमी पावसाच्या वादळी वाऱ्यासह गारा पडून मोठ्या प्रमाणात घरांचे बांधकाम पूर्ण जमीनदोस्त झाले आहेत व बऱ्याच घरांचे पत्रे उडून गेले आहेत. काही शेतकऱ्यांच्या फळ बागांचेही अतोनात नुकसान झाले आहे. बऱ्याच घरांचे नुकसान झाले आहे. तरी आपण आपल्या स्तरावरून गाव कामगार तलाठी यांना तात्काळ पंचनामे करून घेऊन त्याची नुकसान भरपाई मिळवून द्यावी यावी असे आदेश द्यावेत हि आदरपूर्वक नम्र विनंती सतीश नीळ यांनी केली आहे.

