shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ब्रेकिंग न्यूज..! मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा त्याग करून राजीनामा..!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क

सध्या राज्यात गदारोळ उठला असताना मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांनी कुठल्याही प्रकारचा मोह न धरता आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

तसेच आमदारकीचा ही राजीनामा..!

बहुमत चाचणी आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान शिवसेनेशी गद्दारी करून सत्तेत सहभागी होणाऱ्यांना  शुभेच्छा दिल्या आहेत.


सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय. मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी, “आज मला विशेषतः शरद पवार आणि सोनिय गांधी आणि सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहे.  सर्व मंत्रालयीन सर्व अधिकारी, पोलिस प्रशासन, सर्व कर्मचारी,सर्व महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील बांधव आणि भगिनीं यांना धन्यवाद द्यायला आवडेल.

आज निर्णय घेतांना फक्त चार शिवसेनेचे मंत्री होते. बाकीचे तुम्ही जाणताच. या निर्णयाला कोणी विरोध केला नाही, सर्वांनी मान्यता दिली. ज्यांचा विरोध आहे हे भासवलं जात होतं त्यांनी पाठिंबा दिला,” असं म्हणत सहकारी पक्षांचे आभार मानले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यापुढे आता शिवसेनाभवनमध्ये बसून शिवसेनेचे काम करणार असल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शिवसेना ही आपलीच आहे, ती आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही असंही ते म्हणाले.
close