shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुरत हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन भूसंपादनास नगर तालुक्यातील विरोध; भूसंपादनाचे उपजिल्हाधिकारी सिदार्ध भंडारे यांना निवेदन ..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ३० जून २०२२


सुरत हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन भूसंपादनास नगर तालुक्यातील विरोध; भूसंपादनाचे उपजिल्हाधिकारी सिदार्ध भंडारे यांना निवेदन ..!!

अहमदनगर : केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेला सुरत-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी जमिनीचे भूसंपादन आणि मोजणी चे काम वेगानेर सूरू आहे; परंतु शेतकऱ्यांना या महामार्गा संदर्भात प्रशासनाने कुठल्याही प्रकारची विश्वासात घेतलेले नाही; तसेच या महामार्गाबद्दल शेतकऱ्यांना अजून पर्यंत तरी अधिकृतपणे कोणतीही माहिती, अथवा नोटीस दिलेली नाही.
       त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या महामार्गा संदर्भात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. मांजरसुंबा गावातील शेतकऱ्यांची शेती 100% बागायती आहे बहुतांश शेतकऱ्यांची उपजीविका शेती व्यवसायावर अवलंबून असल्याकारणाने आणि या महामार्गामध्ये सुमारे 50 ते 60 शेतकऱ्यांची बायायती शेती मोठ्या प्रमाणात महामार्गाच्या भूसंपादनामध्ये जात आहे.

 त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि शेतकरी देशोधडीला लागणार आहे.

       तरी सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सुरत हैदराबाद या राष्ट्रीय ग्रीनफिल्ड महामार्गाची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना द्यावी, शेतकरयांना विश्वासात घ्यावे, तसेच इतर गावाप्रमाणे जमिनीचा मोबदलाही द्यावा अन्यथा जमिनीच्या भूसंपादनाचे काम करू दिले जाणार नाही अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी, आणि भूसंपादन विभागाचे सिद्धार्थ भंडारे यांना दिले आहे.
        यावेळी आदर्श गाव मांजरसुभा येथील शेतकरी मा.सरपंच रवींद्र कदम, अर्जून कदम, जय राम कदम, गोवर्धन कदम, विलास कदम,भाऊसाहेब कदम, शिवाजी कदम, शंकर कदम, तुकाराम कदम, संजय कदम, गोरक्षनाथ कदम, हरिभाऊ कदम, जयवंत कदम, राधाकिसन कदम, पांडुरंग कदम, कदम कदम, चंद्रभान कदम, संतोष कदम, रावसाहेब कदम, आदी. उपस्थित होते.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close