पळसदेव येथे शिवसेना वर्धापन दिनानिमित्त दिव्यांगणा तीन चाकी सायकल वाटप.
दिव्यांगांना जीवन ज्योती अपंग संस्थेचा स्तुत्य उपक्रम -विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरज काळे.
इंदापूर प्रतिनिधी: मौजे पळसदेव गावांमध्ये शिवसेना वर्धापन दिना निमित्त पळसदेव गावातील दिव्यांगांना जीवन ज्योती अपंग संस्था यांच्या वतीने व शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरज काळे यांच्या उपस्थितीत पळसदेव येथे दिव्यांगांना मोफत तीन चाकी सायकल वाटप करण्यात आले.
समाजामध्ये दिव्यांगानाच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम जीवन ज्योती अपंग संस्थेच्या वतीने इंदापूर तालुक्यात होत आहे . गेली कित्तेक वर्ष अंथरुणावर पडून असणारी व्यक्ती ज्या वेळी तीन चाकी सायकल वरती बसून स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या मदतीशिवाय पुढे-मागे काही अंतर चालत येते. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा कोट्यवधी रुपयां पेक्षा लाख मोलाचा असतोअसे मत सुरज काळे यांनी व्यक्त केले.
येत्या काही दिवसात रुग्ण सेवा करणे कामी ॲम्बुलन्स देण्याचा मानस असल्याचे रोकडे फूड हब चे मालक उद्योजक हरीश रोकडे
यांनी बोलताना सांगितले.
यापुढे जर दिव्यांगांना सायकल, कुबड्या, कृत्रिम हात पाय, इत्यादी साहित्य लागणारे असेल तर सुरज काळे विधानसभा क्षेत्र प्रमुख शिवसेना इंदापूर व जीवन ज्योती अपंग संस्था यांच्यामार्फत देण्यात येईल तरी पळसदेव मधील सुरज काळे यांच्या संपर्क कार्यालयात अपंगाचे सर्टिफिकेट आधार कार्ड द्यावे असे मत शिवसेना माजी तालुकाप्रमुख नितीन कदम यांनी व्यक्त केले.
या वेळी ॲड. नितीन कदम, उद्योजक हरीश रोकडे, राजू रोकडे, रघुनाथ शिंदे-अध्यक्ष प्रहार अपंग संघटनेचे पळसदेव शिवसेना कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोई, आकाश नगरे, विलास काळे, अक्षय भोसले, अशोक चव्हाण, मिथुन चव्हाण ,प्रतीक काळे, बाबासाहेब शिंदे,सचिन बनसुडे, विजय काळे, संदीप पवार , रामहरी काळे, श्रीहरी काळे ,शैलेश पवार इत्यादी उपस्थित होते.
.
या कार्यक्रमास शैलेश पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी जीवन ज्योती अपंग संस्थेचे असेच सहकार्य राहावे त्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

