शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक २१ जून २०२२
देवळाली प्रवरात जमिनीच्या वादातून हाणामार्या
चारजण जखमी || आठजणांवर गुन्हा दाखल..!!
राहुरी : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शेतजमिनीच्या वादातून आठजणांनी मिळून चारजणांना लाकडी काठी व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना दि. 17 जून रोजी घडली आहे. या घटनेत चारजण जखमी झाले आहेत.
देवळाली प्रवरात जमिनीच्या वादातून हाणामार्या
महापालिकेच्या पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल
गायत्री बाबासाहेब चव्हाण, रा. देवळाली प्रवरा, चव्हाण वस्ती, ता. राहुरी या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 17 जून रोजी साडेबारा वाजे दरम्यान यातील आरोपी हे गायत्री चव्हाण यांच्या घरासमोर आले. त्यांनी शेतजमीनच्या वादावरून गायत्री चव्हाण व त्यांची जाव गितांजली चव्हाण यांना शिवीगाळ करुन लाकडी काठ्या व लोखंडी रॉडने मारहाण केली, धमकी दिली. त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेले गायत्री चव्हाण यांचे पती व सासरे यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
गायत्री चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी सतीश पोपट चव्हाण, राजेंद्र पोपट चव्हाण, संजय पोपट चव्हाण, वैशाली सतीश चव्हाण, मिना राजेंद्र चव्हाण, साकरबाई पोपट चव्हाण, मंदाबाई संजय चव्हाण, चैतन्य सतीश चव्हाण सर्व रा. चव्हाण वस्ती, देवळाली प्रवरा, ता. राहुरी या आठजणांवर मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत गायत्री बाबासाहेब चव्हाण, गितांजली जालिंदर चव्हाण, बाबासाहेब सोपान चव्हाण, सोपान दादा चव्हाण हे जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास हवालदार भिताडे हे करीत आहेत.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

