shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रुग्णवाहिकेमुळे जखमी वानराला मिळाले जीवदान..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 बुधवार दिनांक २१ जून २०२२

रुग्णवाहिकेमुळे जखमी वानराला मिळाले जीवदान..!!

अहमदनगर : तालुक्यातील जेऊर येथील सुनिल पवार युवा प्रतिष्ठानच्या बायजामाता रुग्णवाहिकेमुळे अपघातात जखमी झालेल्या वानराचे प्राण वाचल्याची घटना इमामपूर घाटात घडली. नगर-औरंगाबाद महामार्गावर इमामपूर घाटात वानराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
घटनेची माहिती समजल्यानंतर जेऊर येथील सुनील पवार युवा प्रतिष्ठान संचलित रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्या रुग्णवाहिकेत जखमी वानराला जेऊर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी वानरावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याच रुग्णवाहिकेतून जखमी वानराला पुढील उपचारासाठी वनविभागाच्या नगर येथील कार्यालयात हलविण्यात आले आहे.

रुग्णवाहिका ही माणसांना जीवनदान देण्याचे काम करत असतात. परंतु वन्य प्राण्याला जीवनदान देण्यासाठी सुनील पवार युवा प्रतिष्ठानची रुग्णवाहिका धावून आल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close