shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आनीताताई नानासाहेब खरात यांची वरकुटे खुर्द गणा मधून उमेदवारीसाठी चर्चा.

आनीताताई नानासाहेब खरात यांची  वरकुटे खुर्द गणा मधून उमेदवारीसाठी चर्चा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील गट गण रचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून यामध्ये  वरकुटे खुर्द हा नवीन गण तयार झाला असून या गणांमध्ये
 इंदापूर तालुक्यातील खोरोची येथील नानासाहेब खरात हे कॉलेज जीवनापासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या मध्यमातून  राजकारणात  हिरारीने भाग घेतला आणि जनतेच्या मनामनात स्वतःची ओळख निर्माण केली होती. असे खरात यांची पत्नी सामाजिक कार्यकर्त्या आणि तेजपृथ्वि ग्रुपच्या अध्यक्षा सौ. अनीताताई नानासाहेब खरात  यांनी आपल्या पतीच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले.गुणवंतांचा सन्मान करून त्यांचा कला गुनात उत्साह कसा वाढेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले.गरीब गरजूंना मदत करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी  महापुरुषांचे विचार जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. या महापुरुषांच्या जयंती उत्सवा निमित्त सामाजिक ,शैक्षणिक, राजकीय,  प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍यांचा गुणगौरवपर पारितोषिक  देऊन सन्मान केला.महिला दक्षता समितीच्या सदस्य पदी निवड झाल्यापासून त्यांनी महिलांना आधार देण्याचा प्रयत्न केला. कोविड काळामध्ये अनेकांना मदतीचा हात दिला. असे कार्य असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या यांना वरखुटे खुर्द गणा मधून पंचायत समिती सदस्य पदाची उमेदवारीची माळ गळ्यात पडेल अशी चर्चा या भागातील जनतेत असल्याचे दिसून येते.

याच गणात विविध पक्षातील मातब्बर कार्यकर्ते व नेते आहेत. अनेक पदाधिकारी कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक  आहेत. परंतु असे असतानाही या भागातील जनतेमध्ये अनिताताई खरात यांची उमेदवारी मिळेल अशी चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.

अनिताताई खरात यांच्या उमेदवारीच्या चर्चेने त्यांना कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळेल?. का? जनता त्यांना अपक्ष उमेदवारी लढवण्यास भाग पडते की काय? हे पुढील काळात दिसून येईल.
close