shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा माऱ्यामुळे फळपिके, विद्युत खांबे, गोठ्यांचे, घरांची पडझडीने मोठ्या प्रमाणात नुकसान - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी करून पंचनामा करण्याचे दिले निर्देश.

इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा माऱ्यामुळे फळपिके, विद्युत खांबे, गोठ्यांचे, घरांची पडझडीने मोठ्या प्रमाणात नुकसान - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी करून पंचनामा करण्याचे दिले निर्देश.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यात मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसात वादळी वाऱ्याचा माऱ्यामुळे फळपिके, विद्युत खांबे, गोठ्यांचे, घरांची पडझडीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे युद्धपातळीवर तातडीने करून घेण्यात यावेत असा आदेश सामान्य प्रशासन राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिले.
    गिरवी ( ता. इंदापूर ) येथे वादळी वारे व पावसामुळे नुकसान झालेल्या केळीची पाहणी प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश शिंदे सर, युवकचे प्रदेश सरचिटणीस संग्रामसिंह पाटील, रोहयोचे तालुका अध्यक्ष श्रीकांत बोडके, युवकचे तालुका सरचिटणीस नागेश गायकवाड, पांडुरंग डिसले, दादासाहेब क्षिरसागर, दिपक क्षिरसागर आदि मान्यवर उपस्थित होते.
    राज्यमंत्री भरणे पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या नुकसानींचे पंचनामे युद्धपातळीवर तातडीने करून घेण्यात यावेत. तालुक्यात मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसात वादळी वाऱ्याचा माऱ्यामुळे फळपिके, विद्युत खांबे, गोठ्यांचे, घरांची पडझडीसह आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने युद्धपातळीवर करून घ्यावेत. पंचनाम्यातून कोणीही राहता कामा नये. प्रशासनातील सर्व विभागाच्या प्रमुखांनी बारकाईने लक्ष देऊन नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत तसेच विद्युत खांबांचे उभारणी तातडीने करून वीज पुरवठा सुरळीत करावा असे आदेश त्यांनी दिले.
    दरम्यान तहसीलदार श्रीकांत पाटील यांना भ्रमण दूरध्वनीद्वारे विचारणा केली असता नुकसान झालेल्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून युद्धपातळीवर ते काम पूर्ण करण्यात येईल. तसेच शासनास अहवाल सादर करण्यात येईल असे सांगितले.
   गिरवी, टणू, नरसिंहपूर, पिंपरी बुद्रुक, गोंदी, ओझरे आदि भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, डाळिंब, ऊस, पपई, पेरू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर विद्युत खांब, गोठ्या वरील व घरावरील पत्रे, शेडचे मोठे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची पाहणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पदाधिकाऱ्यां समवेत केली.
close