श्रीरामपूर : - चांगल्या व गुणवान व्यक्तींना हेरून त्यांच्यात आत्मविश्वास भरून जागतिक स्तरावर चमकविण्यात वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अग्रेसर असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व अभिनव खान्देशचे संपादक मा.प्रभाकरराव सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. डब्ल्यूसीपीए तर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२ " च्या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
श्रीरामपूर येथील व्हिआयपी गेस्ट हाऊस सभागृहात झालेल्या आकर्षक समारंभात समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैयक्तीक व संस्थात्मक पुरस्कारांचे वितरण संपन्न झाले. याप्रसंगी बुलढाण्याचे प्रा.अरूण सावंग, मावळ - पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते तानाजी मराठे, श्रीरामपूरच्या बोरावके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस गायकवाड, कृषीतज्ञ श्री. दिनकर पतंगे, प्रा. रामलिंग सावळजकर यांनी वर्ल्ड पार्लमेंटच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते अयुर्वेदात व धार्मिक रिवाजात मानाचे स्थान असलेल्या तुळशीला मान्यवरांच्या हस्ते जलार्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी केलेल्या प्रास्तविकात संस्थेच्या कार्याची व उपक्रमांची माहिती देताना उपस्थितांचे स्वागत केले तर पुरस्कार्थींचे अभिनंदन केले.
या दरम्यान सा. अभिनव खान्देशने काढलेल्या " वर्ल्ड पार्लमेंट अवॉर्ड २०२२ " या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तर पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या विशेष बॅगचे अनावरणही या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्राची शान असलेला फेटा बांधून सर्व पुरस्कार्थी व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कारात मानपत्र, सन्मानचिन्ह व वर्ल्ड पार्लमेंटचे सदस्यत्व ( जागतिक खासदार पद ) देण्यात आले. याप्रसंगी खालील मान्यवरांना " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२ " देऊन गौरवान्वीत करण्यात आले.
मास्टर प्रथमेश किसन मस्के, परभणी ( तबला वादन उत्तेजनार्थ, मा. प्रशांत शंकर भोसले, कर्जत -पुणे (सामाजिक कार्य), मा.रमेश नारायण पाटील, पेण -रायगड ( साहित्य ), मा. सौ. संगिता कृष्णराव गुरव, बदलापूर -मुंबई ( सामाजिक कार्य ), मा.सौ. राजेश्वरी पंकज पाटील - पुणे ( सामाजिक कार्य ), मा.श्रीमती. श्रध्दा संजय भस्मे, खटाव -सातारा ( समाजसेवा ), मा. नागेश सोपान हुलावळे, डोंबीवली -मुंबई (साहित्य,शिक्षण,सांस्कृतिक व सामाजिक), मा.दिनकर श्रीधर पतंगे,जथ- सांगली ( कृषी, पर्यावरण, सांस्कृतिक, सामाजिक), मा.इसा पापामिया शेख, पुणे ( सामाजिक ), मा.प्रितम भिमराव गेडाम, नागपूर (सामाजिक व शिक्षण), मा. प्रा. रामलिंग लक्ष्मण सावळजकर, अकलूज -सोलापूर (शिक्षण, सामाजिक व पर्यावरण ), श्रीमती. प्रतिमा अरूण काळे, निगडी- पुणे (साहित्य, कला व शिक्षण), मा.श्रीमती.रत्ना कृष्णराव चांदगुडे पाटील - कोपरगांव - अहमदनगर ( सामाजिक ), मा. कु. ज्योती वसंत गुरव कराड -सातारा ( ज्योतिषशास्त्र व सामाजिक ), मा.अशोक गेणूजी बागुल, वैजापूर -औरंगाबाद ( शाहीरी, गायन, सामाजिक व साहित्य ), मा.साहेबराव मोहनराव औताडे पाटील, वैजापूर -औरंगाबाद ( सामाजिक ), मा.राजेंद्र शिवशंकर आरळी, जथ- सांगली ( सामाजिक व वैद्यकीय ), मा.सौ. रेजिना सॅबेस्टियन अलमिडा, वसई - पालघर ( सामाजिक ), मा.परशराम रामनाथ साबळे, कोपरगांव ( सामाजिक व शैक्षणिक ), मा.नितिनकुमार सुरेश भालेराव, श्रीरामपूर ( पोलिस सेवा ), मा.पद्माकर जाधव, नाशिक (चित्रपट गीतकार). तर श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयाची शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी संस्था म्हणून यंदा " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड -२०२२ " साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस. गायकवाड यांनी स्विकारला.
मा.प्रसन्नकुमार धुमाळ यांनी आपल्या मधाळवाणीने जानदार सुत्रसंचलन करून कार्यक्रमात रंग भरले. शेवटी प्रा.अक्षय तेलोरे यांनी उपस्थितांचे आभार प्रकट करून एका रंगतदार सोहळ्याची सांगता झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डब्ल्यूसीपीएचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ. ग्लेन मार्टीन, उपाध्यक्ष प्रा. नरसिंहा मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे, सचिव बाबासाहेब वाकचौरे, सहसचिव ऋषिकेश विघावे यांनी विशेष प्रयत्न केले.

