shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छत्रपती शाहुराया या जन्मी नाही फिटणार उपकार तुमचे :- अमोल कांबळे

पुनाळ । प्रतिनिधी(सुरेश वडर):- जन्म देणाऱ्या आईचे उपकार व करवीर संस्थानचे संस्थापक,आरक्षणाचे जनक,दिनदलीतांचे व सर्वसामान्य जनतेचे आधारवड राजर्षी छत्रपती शाहू राजे "या जन्मी नाही फिटणार उपकार तुमचे "असे गौरव उदगार  कोलीक (ता.पन्हाळा)येथील रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल कांबळे यांनी चापेवाडी येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शाहू जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरुन बोलत होते. 

        कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक  रिपब्लिकन सेनेचे  पन्हाळा तालुका अध्यक्ष किरण माळवी यांनी केले.अमोल कांबळे पुढे म्हणाले की, शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महा मानवांचे विचार सध्याची पिढी व येणाऱ्या भविष्यातील पिढी नक्कीच कार्यसक्षम बनवुन विकासाभिमुक कार्य करेल. 

          यावेळी रिपब्लीकन सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम जाधव  म्हणाले की,बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रिद वाक्या प्रमाणे आचरण केल्यास यश शिखर घाटण्यास वेळ लागणार नाही. भारतीय बौद्ध महासभेचे पन्हाळा तालुका अध्यक्ष मोहनजी कांबळे यांनी समता सैनिक दलाचे विस्तृत महत्त्व पटवुन दिले.

        संघर्ष बहुजन सेनेचे जिल्हा उपाअध्यक्ष सात्ताप्पा पोवार मनोगतात म्हणाले की,राजर्षी शाहू राजाविषयी अस्ता व प्रेम आहे म्हणून आंमच्या माता भगीनी व लाहान थोर मंडळी भर पावसात देखील भिजत या जयंतीला हजेरी लावली हे मी परंम भाग्य समजतो.

           यावेळी  पुतळा परीसरात विविध रोपवटीकांची झाडे लावलीत व जनतेला यातुन पर्यावरण वाचवा झाडे लावा असा शुभ संदेश दिला. तसेच बाजारभोगाव परीसरातील बहूजन वर्गातील विद्यार्थी 10वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्यांचे  वही,पेन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच भागोजी लांबोर,रिपब्लिकन सेनेचे जिल्हा सचीव उत्तम कांबळे,मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे पन्हाळा तालुका प्रमुख सुरेश वडर अरुण पोवार समता सैनिक संरक्षण  उपाअध्यक्ष  ,सुभाष भास्कर,सत्यम माळवी,राणी कांबळे,संपदा कांबळे,छाया कांबळे,भारती कांबळे,अनील माळवी,मंगेश कांबळे,उन्मेश कांबळे,सुरेश सरनाईक,देवदत्त माळवी,परशुराम कांबळे,आदी उपस्थित होती.अभार उत्तम कांबळे  यांनी मानले.
close