देहू येथे जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पणासाठी ५० हजारापेक्षा जास्त वारकरी येणार- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
इंदापूर प्रतिनिधी:पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पणाकरीता देहू येथे १४ जून रोजी येणार असून या कार्यक्रमासाठी ५० हजारापेक्षा जास्त वारकऱी येणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या समवेत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, महाराष्ट्र ही संताची भुमी असून देहू येथील ट्रस्ट ने उभारलेल्या जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पणाकरीता ५० हजारापेक्षा जास्त वारकरी येणार आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेप्रमाणे या कार्यक्रमाचे नियोजन होत आहे. पालखीचे प्रस्थान देखील काही दिवसांनी होणार असल्याने वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे.

