पत्नीची पोलिस स्टेशनला तक्रार दाखल!
चंद्रपूर -किरण घाटे -
गत चार वर्षांपासून जिवापाड प्रेम करणा-या एका २५वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह केला त्या नंतर दोघेही संसारात रममाण झाले.परंतु अवघ्या दोन महिण्यांतच तिचा पती बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
या बाबत हाती आलेल्या माहिती नुसार असे कळते कि गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील मुळ रहिवाशी असलेली दिक्षा कालीदास मेश्राम हिचे अहेरी येथील समीर हजरत शेख या २६वर्षिय युवकाशी चार वर्षांपुर्वी प्रेमाचे सुत जुळले.त्या नंतर त्या दोघांनी विवाहबध्द होण्याचा निर्णय घेतला.२०मार्च२०२२ला त्यांचा विवाह चंद्रपूरातील एका मस्जिद मध्ये पार पडला .या विवाहाला मुलाच्या कुटुंबाकडून सातत्याने विरोध होत होता.परंतु प्रेमात गुरफटलेल्या या प्रेमी युगुलांनी विरोधाची पर्वा न करता "साथ जियेंगे" असे म्हणत ते जिवनसाथी बनले .त्यानंतर दोघांनी चंद्रपूरच्या बालाजी वार्डात राहण्यासाठी किरायाची एक रूम बघितली .तेथे दोघेही काही दिवस राहिले .पण चंद्रपुरात समीरचे मन रमले नाही .बाहेर गावी राहाण्यास जावू असा तगादा सतत त्याने (पत्नी) दिक्षाच्या मागे लावला होता .
त्या नंतर ते पती पत्नी दि.२७-५-२२ला आष्टीला पोहचले. रात्री ८:१५वाजता मी माझ्या भावास भेटून येतो असे पत्नीला सांगुन तो त्या आष्टी बसस्थानकावरून निघून गेला . ब-याच वेळ दिक्षाने पती समीरची वाट बघितली पण तो परत आलाच नाही. शेवटी दिक्षा कालीदास मेश्राम उर्फ रूकसार समीर शेख हिने आष्टी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.आज समीर बेपत्ता होवून १५दिवसांचा कालावधी झाला पण समीर पोलिसांना मिळाला नाही.
दरम्यान या बेपत्ता प्रकरणाच्या अनुषंगाने दिक्षाने बल्हारपूर नगरीच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकारी प्रिया झांबरे यांची भेट घेत त्यांना या प्रकरणा विषयी माहिती दिली.त्यांनी लगेच गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक यांची भेट घेत त्यांना या बाबतीत संपूर्ण माहिती दिली.आपण अहेरी पोलिस स्टेशनला लगेच जा मी या बाबतीत अहेरी पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकास सुचना देतो असे ते म्हणाले. दि.८जूनच्या रात्रीच पोलिस स्टेशनला या बाबतीत दिक्षाने परत एक तक्रार या प्रकरणाच्या अनुषंगाने दाखल केली.त्या नंतर मध्यरात्री आष्टी पोलिस स्टेशनला सुध्दा येवून तक्रार नोंदवली या वेळी प्रिया झांबरे ह्या उपस्थित होत्या.
तदपूर्वी दुपारी ४वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी प्राणहिता अहेरी यांचे कडे या बाबत एक लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे.दोन पोलिस स्टेशन व एका उपविभागीय पोलिस अधिका-यांच्या कार्यालयातील पोलिस पथक समीरचा शोध घेत आहेत परंतु त्यांचे प्रयत्नाला अद्याप यश प्राप्त झाले नाही.

