शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):-
प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला ८ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चाच्या वतीने युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर विकास रथ चे आयोजन करण्यात येत आहे. आज या कार्यक्रमाअंतर्गत शिरडी येथे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सदस्य किरण जी बोराडे युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस योगराज परदेशी, तालुका अध्यक्ष सतिष बावके शिर्डी शहराध्यक्ष योगेश गोंदकर याच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिरडी शहरामध्ये स्वागत करण्यात आले होते.
या विकास रथाच्या माध्यमातून भारताचे यशस्वी प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांनी ८ वर्षाच्या कालावधी मधील विकासकामे, जनकल्याणासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती तसेच युवा वर्ग,महिला वर्गांसाठी राबविण्यात आलेल्या योजना त्याची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच विविध योजनांचा लाभ जनतेने घ्यावा याकरिता विकास रथाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भा.ज.युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस-नरेश सुरणा सचिव -सोमराज कावळे, तालुका उपाध्यक्ष-नवनाथ मुजमुले, सचिव- मोहनर मते, अविनाश वाबळे, शिरडी शहर सरचिटणीस-लखन बेलदार ,उपाध्यक्ष-प्रसाद शेलार,अमोल कोते ,सचिव -गणेश सोनवणे,राजेंद्र बलसाने,अक्षय मुळे,सोशल मीडिया प्रमुख- सागर जाधव, भाजपा सोशल मीडिया प्रमुख- राहुल घुले, गणेश शेळके आदी उपस्थित होते.

