प्रतिनिधी : सचिन जव्हेरी
करमाळा :१५ / करमाळा नगर परिषदेची आरक्षण सोडत झाल्याने निवडणुक आखाड्यात उतरण्यासाठी इच्छुकांसह सर्व राजकीय गटतट निवडणूकीची जुळवाजुळव करण्याच्या तयारीला लागले असुन, युत्यांचे साटेलोटे होणार की स्वतंत निवडणुक होणार हे अद्याप अनुत्तरीत आहे
वास्तविक पहाता आरक्षण सोडतीने कुठे कसा सामना रंगणार हे स्पष्ट झाल्याने तालुक्यातील जगताप गट, बागल, गट, सावंत गट, भाजप,राष्ट्रवादी,काँग्रेस, शिवसेना, नागरिक संघटना यांनी त्या त्या प्रभागात आपल्याला चांगला फाईटर उमेदवार शोधण्यास सुरूवात केली आहे. "युत्यांचे साटेलोटे" होईल तेंव्हा होईलच पण निवडणुक लढण्याची संपुर्ण तयारी करून ठेवली पाहिजे म्हणून ही शोधाशोध ! कारण सर्वच गटतट-पक्ष यांनी, आम्ही सर्वच्या सर्व जागा लढवणार असल्याच्या घोषणा जरी केल्या असल्या तरी मात्र ही निवडणुक स्वबळावर लढली जाईल का ? हा संशोधनाचा भाग आहे. परंतु करमाळा शहरात गेली वीस वर्षापासुन करमळा नगर परिषदेवर माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सत्ता असुन गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांचे चिरंजीव वैभवराजे जगताप हे जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी निवडून आले होते. करमाळा शहरात जगताप गटाचे आजपर्यंत पारडे जरी जड असले तरी यंदा त्यांना सत्ता टिकवून ठेवण्यासाठी संघर्षच करून जनतेत मिसळावे लागणार आहे, विरोधकांनी जगताप रोको करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत. या निवडणुकीत ऐकला चलोची भुमिका कोणाच्या वाट्याला येणार हे आज सांगता येत नाही, राजकारणत मित्राचा मित्र तो आपला मित्र, आणि मित्राचा शत्रु तो ही आपला मित्र हे सुत्र ज्यांना उमगले ते राजकारणात यशस्वी झाल्याचा इतिहास आपण पहातो आहोत.
आमदार संजयमामा शिंदे यांच्यासोबत आज माजी आमदार जयवंतराव जगताप, सावंत गट आणि नागरिक संघटना असले तरी यांच्यात आजतरी एकमत दिसत नाही, तर भाजपचे गणेश चिवटे यांनीही आपली भुमिका अद्याप स्पष्ट केली नाही. राष्ट्वादी काॅग्रेसचे अँड शिवराज जगताप, काॅग्रेसचे प्रतापराव जगताप, आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रविण कटारिया यांच्या पक्षाचे आज महाराष्ट्रात सरकार आहे त्यामुळे यांचीही राजकीय भुमिका काय असेल याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविली जाणार की गटातटावर हा देखील प्रश्न गुलदस्त्यात असल्याने करमाळा शहरात आज तरी, जर-तर चे तर्क वितर्क, लढविले जात आहे. शेवटी हे करमाळा आहे, आणि कधी काय करेल, याचा नेम नाही याची स्पष्टोकती दस्तुरखुद्द शरदचंद्र पवार यांनी करमाळ्यातील जाहीर सभेत केली होती .आणि हेच खरे !
मात्र प्रत्येक प्रभागातील उमेदवार जरी निश्चित नसले, किंवा त्यांचे संशोधन सुरू असले तरी सावंत गटाचे नगरसेवक असलेले संजय सावंत यांची उमेदवार मात्र त्यांच्या प्रभागातुन फिक्स मानली जात आहे .

