shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत तेजस्विनी हिरडे ची सुवर्ण कामगिरी



प्रतिनिधी :संजय वायकर

नगर : १५ /   छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे १२ जुन रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धा २०२२ मध्ये नगरच्या कु .तेजस्विनी गिरिष हिरडे हिने सुवर्णपदक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले . तेजस्विनी न्यू लॉ कॉलेज येथील गिरिष हिरडे सर यांची मुलगी असुन हिरडे सर यांनी तेजस्विनीला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे .

महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धा, श्री शिवछत्रपती स्पोर्ट कॉम्प्लेक्स
२०२२ महाळुंगे, बालेवाडी पुणे या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये नगर येथील गुरुकुल कराटे क्लासचे मास्टर सौ. मंदा खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली कु .तेजस्विनी गिरीश हिरडे हिला सुवर्णपदक प्राप्त झाले.

 प्रशिक्षक खंडारे मॅडम तसेच आईवडिलांचे सतत असणारे प्रोत्साहन यामुळेच सुवर्ण पदका पर्यंत मजल मारल्याचे तेजस्विनीने सांगितले . कराटे मध्ये भारताचे नाव उज्वल करण्याचे तिचे स्वप्न असल्याचे तिने सांगितले .

या तिच्या सुवर्ण यशाबद्दल तिचे सर्व स्तरातुन कौतुक होत असून अकॅडमी मार्फत तेजस्विनीचे मिळालेल्या सुवर्ण यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .
close