इंदापूर प्रतिनिधी: एन.ई. एस. हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज निमसाखर मध्ये इ. ५ वी च्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करून शुभेच्छा दिल्या .
आज दि.१५जून २०२२रोजी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रथम दिवस, निमसाखर विद्यालयात खूप आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.इ. ५ वी. प्रवेशोत्सवाची सुरुवात संस्थेचे सचिव धनंजय सुर्यकांतराव रणवरे यांनी सरस्वती पूजनाने करून केली.
यावेळी संस्थेचे सचिव धनंजय रणवरे यांनी इ.१२ वी च्या लागलेल्या निकालाबद्दल सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आणि विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री रणवरे सर ,
पर्यवेक्षक श्री खरात सर,ज्युनियर विभागप्रमुख श्री.बोन्द्रे सर,श्री रणवरे सर व इतर सर्व मान्यवरांनी पाचवीतील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प,कागदी टोप्या,चॉकलेट,पाठयपुस्तके देऊन स्वागत करून सजावट केलेल्या वर्गात विद्यार्थ्यांना बसवण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार "नारळी गोड भात" देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री मलगुंडे सरांनी केले.

