shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जि. प. प्रा. शाळा काझड मध्ये इयत्ता पहिली प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.

जि. प. प्रा. शाळा काझड मध्ये इयत्ता पहिली प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काझड मध्ये इयत्ता पहिली प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. 
दोन वर्षाच्या प्रदिर्घ कोरोना कालावधीनंतर यावर्षी प्रथमच काझड शाळेमध्ये प्रवेशोत्सव इयत्ता पहिली व पाचवी उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी मुलांना गुलाब पुष्प  , फुगे तसेच  अभ्यासक्रमाची पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आला. 
कार्यक्रमासाठी काझड गावचे सरपंच अजित पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समिती  अध्यक्ष संतोष राजगुरू शाळा व्यवस्थापन समिती सदस्य चंद्रशेखर नाळे, जितूल धायगुडे ,नवनाथ नरूटे, निवृत्त शिक्षक श्री दत्तात्रय शिंदे तसेच ग्राम विकास अधिकारी गौंड  गावातील तरुण सचिन नरुटे नाथा नरुटे व पालक उपस्थित होते. मुलांच्या चेहऱ्यावर आज पहिल्या दिवशी खूप उत्साह जाणवत होता. सर्व मुले शाळेचा पहिला दिवस असूनही उपस्थित होती. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक आदिनाथ धायगुडे व सहशिक्षक गजानन माने राजेंद्र शिंदे शिवाजी लाळगे शहाजी म्हेत्रे अतुल धायगुडे राजकुमार माळवे संजीवनी सिताप यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले सर्व मुले खूप उत्साहात होती.
close