कौठळी शाळेत आज शाळापूर्व तयारी मेळावा 2, नवागतांचे स्वागत,मोफत पाठ्यपुस्तके वाटप उत्साहात.
इंदापूर प्रतिनिधी:आज दिनांक १५ जून २०२२ रोजी जि प प्राथमिक शाळा कौठळी येथे शाळेचा पहिला दिवस उत्साहात पार पडला.प्रथम सर्व मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली.नंतर मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी सरांनी प्रास्ताविक केले.शाळापूर्व तयारी मेळाव्यात वजन,उंची,शारीरिक विकास,भाषिक विकास,तर्कसंगती,गणनपूर्व क्रिया याची प्रात्यक्षिके घेऊन पालकांचे समुपदेशन केले.नंतर इयत्ता १ली दाखल झालेल्या मुलांचे स्वागत अंकलिपी,गुलाबपुष्प, फुगे,चॉकलेट देऊन करण्यात आले.नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.शालेय पोषण आहार अंतर्गत सर्व मुलांना पहिल्या दिवशी गोड पदार्थ म्हणून शिरा देण्यात आला.उपस्थित सर्वांचे स्वागत आरती गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमाला शाळा व्य.समितीचे अध्यक्ष सुभाष पिसाळ,उपाध्यक्ष चंद्रकांत माने,ग्रामपंचायत सदस्य बापू चितारे,साहेबराव पिसाळ,अमोल मोरे,आदिक माने,महादेव मोहिते, अरुणा मारकड,दीपाली पाटोळे,राणी पाटोळे,हेमांजली माने,अंगणवाडी सेविका राजेश्री मोरे,त्रिशला पोळके,तनुजा मारकड उपस्थित होते.आभार भारत ननवरे यांनी मानले.सदर कार्यक्रमाचे कौतुक पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात साहेब, विस्तार अधिकारी सुनील मुगळे साहेब, केंद्रप्रमुख संभाजी आजबे साहेब यांनी केले.💐*

