shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गागरगांव येथे पहिलीच्या मुलांचे जंगी स्वागत.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गागरगांव येथे पहिलीच्या मुलांचे जंगी स्वागत.

इंदापूर प्रतिनिधी:आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गागरगांव येथे इयत्ता पहिली विद्यार्थी प्रवेश व नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत,पहिल्या दिवशी मुलांना  गणवेश वाटप आणि शाळा पूर्व तयारी वर्ग २  आयोजन करण्यात आले. 
यानिमित्ताने गावातून वाजतगाजत प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश वाटप करण्यात आले.  पहिलीच्या मुलांचे पुस्तक, गणवेश, वही पेन्सिल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच चाँकलेट आणि मिठाईचे सर्व मुलांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी उपसभापती नारायण वीर, युवा नेते देविदास वीर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश भोसले, नितीन मिंड, संतोष मिंड आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक वसंत फलफले यांनी सर्वाचे स्वागत आणि प्रास्ताविक केले तर शाळेच्या उपशिक्षिका मंदाकिनी हेंबाडे यांनी आभार मानले.
close